कंधार ; दिगांबर वाघमारे
विशेष सहाय्य
विभागाकडून निराधारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध स्वरुपातील योजनांचा लाभ घेणा यांना उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत दिली होती, ती वाढवून कंधार चे प्रभारी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी ३० जुलै केली आहे. त्याबदल माजी सैनिक संघटनेच्या वतीने बालाजी चुकलवाड यांनी तहसिल प्रशासनाचे आभार मानले .
संजय गांधी निराधार योजनेसह इतर विशेष अनुदान घेणा या निराधार व्यक्ती, दिव्यांग, विधवांना आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अजासीबत उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. निराधारांना पेन्शन योजनेचा अल्पसा असलेला आधारही एका दाखल्याअभावी नाहीसा होऊ शकतो.
प्रत्येक वर्षी जूनपर्यंत निराधारांना उत्पन्नाचा दाखला जमा करणे बंधनकारक करण्यात आले असून, तो न दिल्यास शासनाकडून दिले जाणारे अर्थसहाय बंद केले जाणार असल्याने लाभार्थ्यांची धावपळ उडाली .

