नायगाव ; प्रतिनिधी
नांदेड येथील रत्नाकर कुलकर्णी ह्या पेशंट चा hb खूप कमी असल्यामुळे त्यांना सारखे चक्कर येणे डोळ्याला अंधारी येणे असे प्रकार होत असे रत्नाकर यांनी नांदेड येथील अर्धापूरकर हॉस्पिटल मध्ये दाखल झाले असता डॉक्टरांनी त्यांना ब्लड लावायला सांगले असता, दुर्मिळ रक्तगट शोधायचा कुठे बॉम्बे ब्लड ग्रुप डोनर माधव सुवर्णकार ह्यांच्याकडे केस पालघर येथील सौ. उषा म्हात्रे ताई ह्यांच्या मार्फत आली असता एम सुवर्णकार यांनी रात्री 11 वाजता श्री. एन टी सरांना संपर्क करून केस बदल माहिती दिली असता एन टी सरांनी लगेच होकार दिला मी रक्तदान करण्यास येतोय काळजी करू नका असे सांगितले. जीवन आधार ब्लड बँक नांदेड येथे येऊन एन टी सरांनी आता पर्यंत 19 वेळा रक्तदान केले आहे. खरंच एन टी सरांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
त्यांचा तीस जून रोजी वाढदिवस होता त्याच दिवशी रक्तदान करण्याची त्यांची खूप इच्छा होती पण दुर्मिळ रक्तगट असल्याने त्या दिवशी रक्तदान ची गरज नव्हती म्हणून त्यानी आज माधव सुवर्णकार,सावता चौधरी सर व आनंद घोगरे सर यांच्या उपस्थितीत रक्तदान केले
सरांनी रक्तदानाच्या माध्येमातून असे सांगितले की जिथे रक्ताची कमी तिथे आम्ही हे ब्रीदवाक्य आहे असे म्हणत “उत्सव मैं मिलु या ना मीलू लेकीन रक्त सेवा “परिवार” दुःखी की घडी मैं सबके साथ हुं, असे एन टी सर सांगितले.
रक्तदानाचे महत्व त्यालाच कळते जे नियमित रक्तदान करतो.