भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर यांनी घेतला कंधार नगरपालिका निवडणूका संदर्भात आढावा

कंधार ; प्रतिनिधी

कंधार नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आज लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर  यांच्या कंधार येथील संपर्क कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात नवीन सरकार आल्याबद्दल प्रविण पाटील चिखलीकर यांचा सत्कार करून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

या बैठकीला मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा सरचिटणीस  प्रविण पाटील चिखलीकर , बाबुरावजी केंद्रे, नगरपालिका उपाध्यक्ष  जफरोदिन बाहोद्दीन,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान  राठोड,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश लाला गौर,भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ औरादकर,

भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,भाजपा शहर अध्यक्ष अॅड  गंगाप्रसाद यन्नावार, नगरपालिका निवडणुक पक्ष निरीक्षक भाजपा जेष्ठ नेते किरण सावकार वट्टमवार, व  इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *