काय?..ऽऽ डोंगर..काय?..ऽऽ झाडी…काय?..ऽऽ कासारखिळा नयनरम्य करण्यासाठी हरित कंधार परिवार कटिबद्ध!

कंधार ;
कंधार तालूका हा डोंगर-दर्यांचा म्हटला जातो.मन्याड खोर्‍याच्या कुशीत वसलेल्या तालुक्यात पर्यावरणाच्या रक्षकरण्यासाठी सदैव तप्तर असलेला शिवा मामडे यांच्या संकल्पनेतून हरित कंधार परिवार गेली पाच वर्षांपासून कार्यरत आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,कृषिक्रांतीचे जनक,कृषि कोहिनूर स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त अभिवादन करुन सन २०१७ या वर्षी महाराणा प्रताप चौक ते बसस्थानक अन् महाराणा प्रताप चौक ते शिवेवरील गणपती ५०० वृक्ष लागवड करुन त्यातले ९० % वृक्ष जगविले.२०१८ साली कंधार शहरातील सर्व कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करुन ते जगविले.

२०१९ व २०२० ही सलग दोन वर्ष त्या लावलेल्या वृक्षांचे पाणी देवून संगोपन केले.२०२१ साली म्हणजे गेल्या वर्षी मोफत फळझाड त्यात अंबा,पेरु,जांभुळ,गळलिंबु, मोसंबी,लिंबु तेजपत्ता अशी अनेक वृक्ष वृक्ष जगवा अन् १००० रु.मिळवा या तत्वावर हरित कंधार परिवारांनी अॅप व्दारे वृक्षाचे अपडेट देवून बक्षीसपात्र व्हावे असे आवाहन केले होते. पण या वर्षी पांगरा नगरी शेजारी असलेल्या खुड्याचीवाडी शिवारातील शासकिय २० एकर गायरान जमीनीवर २००० वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार करुन आज कृषिकोहिनुर स्व.वसंतराव नाईक साहेब यांना अभिवंदन करुन हरित कंधार परिवाराच्या वृक्षारोपण कार्यक्रमास आरंभ झाला.या कार्यक्रमात कंधार येथील उपविभागीय अधिकारी शरदराव मंडलिक,कंधार तहसिलचे मामलेदार व्यंकटेश मुंडे,कंधारचे गट विकास अधिकारी सुधिश मांजरमकर,विभागीय वन परिक्षेत्राधिकारी आशिष हिवरे
माजी जि.प.सदस्य व मानवता धर्म सामाजिक बांधिलकीतून जपणारा “भाऊचा डबा” उपक्रमाचे संयोजक प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे,भगवान राठोड, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरिय विद्यालयाच्या ज्योती बहेनजी, पांगरा नगरीचे सरपंच सखाराम सूर्यवंशी,उप सरपंच गोविंदराव ठाकूर, शिवशंकर विद्यालय पांगराचे मुख्याध्यापक मा.बिडवे,श्री शिवाजी हायस्कूल कंधारचे पर्यवेक्षक मा. तुकाराम कारागीर,क्रिडा शिक्षक मा.आनंदराव भोसले, श्री शिवाजी काॅलेज कंधारच्या एन.सी.सी.तुकडी सह मेजर मा.दिलीप सावंत संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहाच्या एन.सी.सी.तुकडीसह मेजर व्ही.टी. ठाकूर, कै.विश्वनाथ कौसल्ये मा.विद्यालय पांगराचे मुख्याध्यापक गायकवाड जि.प.प्राथमिक शाळा पांगराचे मुख्याध्यापक मा. केंद्रे सर,जि.प.प्राथमिक शाळा पांगरा तोंडाचे मुख्याध्यापक भालेराव यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थिती होती.तसेच पं.स.सदस्य मा. उत्तम चव्हाण, पं.स.सदस्य मा. सत्यनारायण मानसपुरे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा. अँड. मारोतीराव पंढरे,अॅड.मा.कागणे, मा. अॅड दिलीप कुरुडे,योगगुरू नीळकंठ मोरे,सुंदर अक्षर कार्यशाळेचे दत्तात्रय एमेकर,कृषि साहाय्यक एस.डी.होनराव, डाॅ.पी.व्ही.पांचाळ,सरपंच दिलीप खुडे,अँड बाबु पाटील आदींची विचारपिठावर उपस्थिती होती.


माजी मुख्यमंत्री,कृषिकोहिनुर स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून सर्व उपस्थित मान्यवरांचे “अतिथी देवो भव!” या उक्ती प्रमाणे हरित कंधार परिवारांच्या वतीने ह्रदय सत्कार संयोजक शिवाभाऊ मामडे यांनी व हरित कंधार परिवार सदस्याच्यां समर्थ हस्ते सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संकल्पना मा.शिवाभाऊ मामडे यांनी मांडली.त्यांनर भगवानराव राठोड, यांनी स्व.वसंतराव नाईक यांना अभिवंदन करुन नैसर्गिक प्राणवायु किती महत्त्वाचा आहे,हे कोरोनाने आपल्याला पटवून दिले आहे.प्रत्येक नगरात अशी वृक्षारोपण करण्याचे उपक्रम व्हावेत असा विचार मांडला.ज्योती बहेनजी यांनी हरित कंधार परिवारचे संयोजक शिवाभाऊ मामडे व सर्व टिमचे कौतुक करुन यांच्या कार्याचा गौरव केला.,प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी दरवर्षीच हरित कंधार परिवार यांच्या कार्यावर खुष असतात, त्यांनी आपल्या भाषणात माझी आजी मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या पुण्यतिथी निमित्त नांदेड-बिदर द्रुतगती महामार्गाच्या दोन्हीही बाजुंनी वृक्षारोपण करण्याचा मनोदय व्यक्त केला.हरित कंधार परिवार यांचा स्तूत्य उपक्रम सर्व सामाजिक सेवाभावी वृतीने आपण पाचव्या वर्षात पदार्पण करतोय हे खरच कौतुकास्पदच आहे.प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी आपला उपक्रम भाऊचा डबा उपस्थितांना व विद्यार्थ्यांसह सर्वांना सुरुची भोजचा आनंद दिला.गट विकास अधिकारी मांजरमकर, आशिष हिवरे, तहसिलदार व्यंकटेश मुंडे शेवटी उपविभागीय अधिकारी शरदराव मंडलिक साहेब यांनी हरित कंधार परिवाराचे प्रथमतः अभिनंदन करुन दोनशे,तीनशे,चारशे,पाचशे फुटावरी पाणी आपल्या वडीलांनी या जमीनत मुरविले म्हणून आपल्या कांहीतरी हलचाल करता येत आहे.जर आपण पुर्वीच्या वडीलधार्यांचा कित्ता गिरवला नाही तर,येणारे भविष्य अंधःकारमय असेल?माझ्याकडे तुम्ही कोणत्याही प्रकारचे सहकार्य मागीतल्यास मी ती पुर्तता करण्यास तत्परच असेल.या वृक्षारोपण कार्यक्रमास सदिच्छा देवून आपले विचार मांडले.एकाच वेळी २००० वृक्षांची लागवड करुन एक अनोखा रेकॉर्ड हरित कंधार परिवारांनी केला.या ऐतिहासिक क्षणाचे क्षणचित्रण ड्रोन कॅमेर्‍यात टिपले आहे.

यशस्वीतेसाठी हरित कंधार परिवाराचे शिवा मामडे, प्रदीप गरुडकर, शहाजी नळगे ,अड गंगाप्रसाद यन्नावार, अजय मोरे ,संजय ढगे, नामदेव सुवर्णकार ,सागर डोंगरजकर ,योगेंद्रसिंह ठाकूर ,रमाकांत फुके ,जितेंद्र गरुडकर, राजरत्न सूर्यवंशी,गजानन गरुसुडकर, मधुकर मुसळे ,दिपक गरूडकर, कु.श्रुती मुसळे यांनी प्रयत्न केला या वेळी महसूलचे कर्मचारी,मंडळाधिकारी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती प्रथमच एकाच वेळी दोन हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम नांदेड जिल्ह्यात हरित कंधार परिवाराच्या वतीने राबवण्यात आला.या निसर्ग सौंदर्याने नटविण्याच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन अॅड गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले. अशा स्तूत्य उपक्रम राबविल्या बद्दल हरित कंधार परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे

शबदांकन ; दतात्रय एमेकर

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *