कृषी विभाग पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कंधार यांच्या संयुक्त विध्येमाने कै वसंतराव नाईक सभागृहात अभिवादन कार्यक्रम संपन्न

कंधार ; प्रतिनिधी

कृषी विभाग पंचायत समिती कंधार व तालुका कृषी अधिकारी कंधार यांच्या संयुक्त विध्येमानाने कै वसंतराव नाईक सभागृह पंचायत समिती कंधार येथे 1 जुलै रोजी वसंतराव नाईक जयंती व कृषी दिन साजरा करण्यात आला

या कार्यक्रमास गटविकास अधिकारी मांजरंकर एस एन ,पंडितराव देवकांबले मा सभापती ,प्रतिनिधी राजकुमार केकाटे रां कं. शहर आधक्ष्य, माधव गित्ते सुधाकर सूर्यवंशी मा. प.स. सदस्य आत्माराम धुलगुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपेलवार पंचायत समिती चे कृषी अधिकारी गणेश यादव बी जी कांबळे कृषी अधिकारी डी एन भारती विस्तार आधिकारी कृषी उजमा मॅडम विस्तार आधिकरी कृषी श्री विकास नारनाळीकर मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी डॉ राचेवाड सर कृषी प्रयेवेक्षक श्री आर एम भुरे, रोहिणी पवार, वरकड व तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक तसेच आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार याची उपस्थिती होती . कै वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमांस सुरुवात केली आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यां चा सत्कार करण्यात आला यात प्रभाकर व्यवहारे, बाबूसावकार गंजेवार यांनी मनोगत व्यक्त केले

सूत्रसंचालन श्री गणेश यादव कृषी अधिकारी पंचायत समिती कंधार यांनी केली , तसेच तालुका कृषी आधीकारी सदानंद पोटपेलवार यांनी कृषी विभागाच्या विविध योजना बद्दल माहिती दिली व कार्यक्रमाची प्रस्तावना केली तसेच मंडळ कृषी अधिकारी पेठवडज विकास नारळीकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर प्रारूप केले प्रगतशील शेतकरी प्रभाकर व्यवहारे यांनी कृषी विभागातील फळबाग लागवड योजनेचे यशोगाथा सांगितली बाबू सावकार गंजेवार यांनी शेतीत येणाऱ्या समस्येबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले

या कार्यक्रमांस विस्तार अधिकारी श्री गुट्टे सर पंचायत विस्तार अधिकारी कृषी पर्वेक्षक, कृषी सहाय्यक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षीय समारोप श्री मांजरमकर एस एन गट विकास अधिकारी कंधार यांनी केले सदर कार्यक्रम पार पडल्यानंतर मौजे शिरसी बुद्रुक तालुका कंधार येथील शेतकऱ्याच्या बांधावर वृक्षारोपण करण्यात आले व विहिरीचे जलपूजन करण्यात आले यात शुद्धोधन मारुती सरोदे यांनी 22 झाडे दत्ता दामोदर पांचाळ यांनी 15 झाडे बालकिशन गुणारे यांनी 22 झाडे असे एकूण 59 वृक्षांची लागवड करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *