नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील निष्ठावान शिवसैनिकांचा ३ जुलै रोजी मेळावा

संपर्कप्रमुख आनंदराव जाधव खासदार हेमंत पाटील , विवेक घोलप करणार मार्गदर्शन


नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील निष्ठावा आणि शिवसैनिकांचा मेळावा दिनांक 3 जुलै रोजी सकाळी दहा वाजता पूर्ण रोडवरील सिद्धी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे . संपर्कप्रमुख आनंदराव जाधव , खासदार हेमंत पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख विवेक घोलप हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असून निष्ठावान शिवसैनिकांनी या मेळावा उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे .


शिवसेनेतील अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेला पुन्हा बळकटी देण्यासाठी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला गत वैभव मिळवून देण्यासाठी पुनर्बांधणी करण्याचे अनुषंगाने शिवाय बंडखोरांच्या बाबतीत आगामी भूमिका ठरविण्याच्या अनुषंगाने दिनांक 3 जुलै रोजी सिद्धी मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास संपर्कप्रमुख आनंदराव जाधव , खा. हेमंत पाटील , नांदेड उत्तर विधानसभा संपर्क प्रमुख विवेक घोलप हे मार्गदर्शन करणार असून यावेळी माजी आमदार अनुसायताई खेडकर , सह संपर्कप्रमुख भुजंग पाटील, प्रकाश मारावार , धोंडू पाटील, डॉ. मनोज भंडारी, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर, युवा सेना प्रदेश सहसचिव माधव पावडे , महेश खेडकर, दयाल गिरी , महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख निकिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यास जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिक, युवा सैनिक महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, महानगर प्रमुख अशोकराव उंमरेकर, शहर प्रमुख सचिन कीसवे, तालुका प्रमुख जयवंत पाटील , युवासेना जिल्हाधिकारी गजानन कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *