कंधार : दिगांबर वाघमारे
निसर्गाचा होणारा ऱ्हास हा निसर्गाचे समतोल बिघडत आहे निसर्गाचे समतोल आबादीत ठेवायचे असेल तर यावर शाश्वत उपायोजना करणे आवश्यक आहे आणि ते उपाय योजना हरित कंधार च्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे असे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी दोन हजार वृक्ष लागवड उपक्रमावेळी केली .
हरित कंधार परिवाराच्या वतीने कासारखेळा पांगरा तालुका कंधार येथे एक जुलै रोजी स्व वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्त दोन हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक ,कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, विभागीय वन परिक्षेत्राधिकारी आशिष हिवरे ,माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम धोंडगे ,गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर ,वनपरिक्षेत्राधिकारी सागर हराळ ,वनपरिक्षेत्राधिकारी कंधारे ,सहायक सरकारी वकील महेश कागणे,भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड ,प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या ज्योती बहेणजी ,पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे ,पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले आणि वृक्ष लागवड हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे म्हणून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावले पाहिजे असे त्यावेळी म्हणाले
यावेळी पुरुषोत्तम धोंडगे यांनी हरित कंधारच्या उपक्रमाची कौतुक करून असे उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहावे जेणेकरून मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड व त्या मुळे पर्जन्यमान कमी होतं त्याचा भाग भरून काढण्यासाठी हरित कंधार परिवार काम करत आहे ते स्तुत्य आहे असे ते यावेळी म्हणाले यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड व वनपरिक्षेत्र विभागीय अधिकारी आशिष हिवरे यांनी मनोगत व्यक्त केले .
विशेषतः यावेळी एक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शिवशंकर माध्यमिक विद्यालय पांगरा ,कै. विश्वनाथराव कौसले माध्यमिक विद्यालय पांगरा ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरा तांडा ,श्री शिवाजी हायस्कूल कंधार ,संत गाडगे महाराज ज्युनियर कॉलेज लोहा, श्री शिवाजी कॉलेज कंधार यांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग नोंदवला एनसीसी व एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी श्रमदान केले कंधार एनसीसी चे कॅप्टन डॉ दिलीप सावंत लोहा एनसीसी चे लेफ्टनंट व्ही टी ठाकूर ,कृषी सहाय्यक एस डी होंनराव,मुख्याध्यापक बिडवे सर ,मुख्याध्यापक गायकवाड सर ,कारागीर सर ,भोसले सर ,मुख्यध्यपक भालेराव,डॉ पी व्ही पांचाळ ,अड मारुती पंढरे,अड दिलीप कुरुडे,अड बाबू पाटील, सरपंच सखाराम सूर्यवंशी ,उपसरपंच गोविंद ठाकूर, सरपंच दिलीप खुडे ,योग्य शिक्षक निळकंठ मोरे,दत्तात्रय येमेकर यांची प्रमुख उपस्थिती होती .