ग्रामीण रुग्णालय कंधार येथे कृषि दिनानिमित्य 50 झाडांची लागवड व विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा आणि डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा

कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या उपस्थित आज दि:-01 जूलै 2022 रोजी सकाळी 10:00 वा ग्रामीण रुग्णालयात माजी.मुख्यमंत्री हारीत क्रांतीचे प्रणेते श्री.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषी दिनाच्या निमित्त वृक्षारोपण कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर साहेब व तसेच हरित कंधार परिवाराचे तालुका अध्यक्ष व वेळोवेळी ग्रामीण रुग्णालयास बळ देणारे समाजसेवक श्री.शिवा मामडे यांनी श्रमदान करून वृक्ष लागवड करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व रुग्णालय परिसरात हरित क्रांती करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.


याप्रसंगी रुग्णालयच्या आवारात विविध उपयोगी वनस्पतींची रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले .
तसेच ग्रामीण रुग्णालयात सर्व परिसर स्वच्छता करून श्री. संत सेवा निरंकारी मंडळ शाखा कंधार सेवादल क्र:-1538 मुख्य मार्गदर्शक संगीता कोकाटे बहेनजी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल इंचार्ज कांतीलाल राठोड, संजय राठोड,उज्वला सिद्धनाथ, जयश्री तमखाने, ज्योत्स्ना बुकटे ,अंजीराम तमखाने,छाया तेलंग,सुनील राठोड, आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर साहेब यांनी श्री.संत निरांकारि मंडळातील सर्व कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कार्यबदल त्यांचे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले.


यावेळी बोलताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर मन्हाले की भारत देश हा कृषिप्रधान देश आहे ह्या देशातील सर्व शेतकरी अन्नदाता त्यामुळे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो व डॉक्टर हा आरोग्य सेवेचा कणा आसून समाजाला निरोगी ठेवण्यामध्ये त्यांचा सिहांचा वाटा असतो म्हणून त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले आहे आणि श्री. संत सेवा निरांकरी मंडळ याना आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी जागरूक केले रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड मौखिक आरोग्य याबदल माहिती सांगण्यात आली.सर्व विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण करण्यात आले.तसेच जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांच्या लक्षणीय कामगिरी व सेवेवर सर्व डॉक्टर्स यांना शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले व शुभेछा देण्यात आले.

आणि विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा याची सुरुवात करण्यात आली आज दि:-01 जुलै ते 15 जुलै या कालावधीत राबविण्यात येत आहे त्यानिमित्ताने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांच्या हस्ते बालकांना ORS आणि Syp-zink (जलसंजीवणी) याची मात्रा सर्व लाभार्थ्यांना देण्यात आली व विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा या कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्ण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *