नांदेड – गुरु पौर्णिमेनिमित्त शहरातील देगाव चाळ प्रज्ञा करुणा विहारात विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ही स्पर्धा संपन्न होणार असून त्यानंतर पूजापाठ , काव्यमैफील, खिरदान, ग्रंथवाचन आदी कार्यक्रम होणार असल्याचे संयोजक सुभाष लोखंडे यांनी कळविले आहे.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील देगाव चाळ प्रज्ञा करुणा विहारात 'स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि आंबेडकरी समाज ' या विषयावर इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ रोख रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत भाषण स्पर्धेनंतर आषाढी ( गुरु ) पौर्णिमेनिमित्त १३ जूलै २०२२ रोजी काव्यपौर्णिमा, खीरदान कार्यक्रम आरतीताई शरद नवघडे यांच्या वतीने होणार असून तसेच ग्रंथ वाचनालाही सुरुवात होत आहे.
अॅड. मायाताई राजभोज या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ पठन करणार आहेत.
परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक पालक सर्वांनी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच भाषण स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक सुभाष लोखंडे, रमामाता महिला मंडळासह सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, सचिव पांडूरंग कोकुलवार, कार्याध्यक्ष शंकर गच्चे, मारोती कदम, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, राज्य समन्वयक प्रशांत गवळे, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य, राज्य संघटक बाबुराव पाईकराव, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांनी केले आहे.