फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे या सततच्या पावसाने येथील प्रा.आ.उपकेंद्रा सह पस्तीस जणांच्या घराची पडझड झाली असुन यात एका पुरातन बारव विहरीचा व बुरजाचाही पडझाडीत समावेश आहे.
या सतंतधार पावसाच्या झडीत पडलेल्या घरांची या सज्याच्या तलाठी श्रीदेवी उत्सुर्गे व ग्रामविकास अधिकारी आमृता मंगनाळे यांनी प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पहाणी करून पंचनामा केला व नोंद घेतली. यावेळी सोबत ग्रा.प. सदस्य प्रविण मंगनाळे ,रहीम शेख यांचीही उपस्थीती होती.
अनेकाच्या घरात पावसाच्या पाण्याने शिरकाव केल्याने घरातील धान्य चे नुकसान झाले , सुदैवाने कुनालाही यात ईजा पोहचली नसून जीवित हानी टळली.
येथील कर्मचारी जिवमुठीत धरुन काम करतात कधीही ईमारत कोसळू शकते अशी अवस्था झाली आहे त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून सुरक्षित ठिकाणी निवारा करावा असताना अधिकाऱ्यांनी येथील आरोग्य सेविकेचे घर भाडेही बंद असल्याचे समोर आले आहे .