तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते नांदेड -लातुर महामार्गाच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण

कंधार ; प्रतिनिधी

नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे, दरम्यान पावसाळ्यात दुतर्फा उपयोगी वृक्षाचे रोपण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.आज दि.17/07/2022 रोजी लोहा-चाकुर टिमच्या वतीने रविवारी मौजे पार्डी परीसरात 1000 वृक्ष लागवड करण्यात आली. या कामाची सुरुवात तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली .

यावेळी नॅशनल हायवे चे श्री शेख,आळंदकर, विठ्ठल ढोक, ईजि.दिपक पाटीदार (प्रौजेक्ट मँनेजर) धर्मेंद्र पाटीदार, अभिषेक मिश्रा, अभिषेक पाराषर,शंकर इंगोले,किरण गिरबीडे, योगेंद्र राऊत, विठ्ठल ढोक,मुकुल धोते,अक्षय सिंग तसेच महसुलचे बारकुजी मोरे, नितीन रायाजी सह परीसरातील ग्रामस्थ, नागरीक,युवक व बालक उपस्थित होते..

यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी लहान मुलांच्या हस्ते काही वृक्ष लावून घेतली व नव्या पिढीला वृक्ष देतांना वृक्ष संवर्धनाच्या जबाबदारीत सामावुन घेतले व लहान मुलांमध्ये वृक्ष लागवडीबाबत उत्साह निर्माण केला

नँशनल हायवे कडून पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येत आहे तीन रांगेत लहान, मध्यम,व मोठी & महावृक्ष करंजी,आपटा,बेल,लिंब, पिंपळ,वड ई. वृक्षाचे रोपण करण्यात येत आहे.‌ तिनं बाय तीन, सहा बाय सहा व बारा बाय बाराच्या रेशोमध्ये सदर वृक्ष आकारानुसार लावली जात आहे, यामुळे ओसाड पडलेली रस्ते भविष्यात नक्कीच हिरवीगार दिसुन येतील अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *