लोहा ; प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील हरबळ येथे दत्ता उद्धवराव येवले या युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, येवले परिवारास सांत्वन पर मदत म्हणून शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी एक लक्ष रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश येवले कुटुंबियाकडे शनिवारी सुपूर्द केला. यावेळी आशाताई शिंदे यांनी येवले परिवाराच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून येवले परिवाराला धीर दिला .
यावेळी सरपंच मालनबाई डोंपल्ले, उपसरपंच अवधूत पाटील शिंदे, सरपंच जनाबाई घुगे, गिरीश डिगोळे, चक्रधर घुगे, तंटामुक्ती अध्यक्ष ताहुजी शिंदे, शालेय समिती अध्यक्ष तुकाराम शिंदे, नामदेव शिंदे, शंकर शिंदे सह येवले परिवारासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.