लोहा ; प्रतिनिधी
विक्रांत दादा मित्रमंडळाच्या वतीने पोलीस स्टेशन लोहा येथे लोहा कंधार तालुक्यामध्ये चालू असणारे अवैध दारू विक्री,जुगार,मटका,
गुटखा व गुडगुडी यांसारखे अवैध धंद्याच्या विरोधात बंद करण्याच्या मागणीचे निवेदन मित्रमंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक तांबे यांना आज शनिवार दि१६ जुन रोजी देण्यात आले.
याप्रसंगी उपसभापती श्याम अण्णा पवार,मारोती येजगे,सुधाकर सातपुते,सचिन पा. शिरसागर,सरपंच सखाराम लोंढे,सिद्धू पाटील वडजे,नागेश पा खांबेगावकर, प्रसाद जाधव,सचिन कल्यानकर सह विक्रांत दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्याप्रसंगी..