कंधार ; प्रतिनिधी
विक्रांत दादा शिंदे मित्र मंडळाच्या वतीने पोलीस स्टेशन उस्माननगर येथे कंधार तालुक्यामध्ये चालू असणारे अवैध दारू विक्री,जुगार,मटका,
गुटखा व गुडगुडी यांसारखे अवैध धंद्याच्या विरोधात बंद करण्याच्या मागणीचे निवेदन मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आले .
याप्रसंगी शेकापचे नांदेड जिल्हा प्रमुख योगेश पा.नंदनवनकर,
माधवराव पा.घोरबांड कलंबरकर,बाळु आनंदवाड शेकाप वडेपुरी सर्कल प्रमुख, तानाजी पा.हुंबाड,सिकंदर शेख शेकाप शिराढोण सर्कल प्रमुख, कचरू बंडेवाड किवळेकर सह विक्रांत दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते