अशोक कुंभार यांना राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

परभणी ; प्रतिनिध r

  जि प  प्रा शा देऊळगाव गात ता सेलू येथील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तंत्रस्नेही जिल्हा परिषद परभणी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री कुंभार अशोक रामराव यांना या वर्षीचा बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक तर्फे दिला जाणारा मानाचा राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *