सरसकट शेतीचे पंचनामे करण्याचे आ. शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. लाडका व धानोरा येथील पूल पावसाच्या पाण्यामुळे खचून गेला होता,हळदा येथील घरांची पडझड झाली होती या सर्व बाबींचा आढावा यावेळी आमदार शिंदे यांनी घेतला,नुकसानग्रस्त पुलांची दुरुस्ती तात्काळ करण्याचे निर्देशही यावेळी आमदार शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले, मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा मी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असून मी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले . यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता सुरेश जोशी, तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपेलवार,गटविकास अधिकारी मांजरमकर, जलसंधारणचे अधिकारी तेलंग सह सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, शेतकरी बांधव कार्यकर्ते उपस्थित होते.