सटवी कि सटवाई

 आताच एक विनोद वाचनात आला आणि त्यावरुन कालचा प्रसंग आठवला.. विनोद असा होता बाळ झोपेत हसलं की सटवाई हसवते आणि बाबा झोपेत हसला की सटवी हसवते...
 काल एका मीटींगसाठी रेस्टॉरंटला बसले होते... समोरच्या टेबलला मायलेकी बसल्या होत्या.. त्यातील आई माझ्या मित्राची मैत्रीण होती...दोघीच्या हातात मोबाईल होता आणि त्या ज्या पध्दतीने गालातल्या गालात हसत चॅट करत होत्या त्यावरुन माझी लेखक नजर हटणारच नव्हती .. दोघींचं सेटींग सुरु होतं हे मी खात्रीने फक्त हावभावावरुनच नाही सांगत तर त्यांची स्टोरी मला माहीत आहे.. पण त्यांना माहीत नाही ही बंडखोर लेखिका मागे बसलेय.. 
   मुलगी प्रेमात पडणं कुतूहल नाही पण आई प्रेमात पडली हा कुतुहलाचा विषय होवु शकतो का माहीत नाही.. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात ... पुस्तकाच्या कव्हरवरुन आपण पुस्तकाला जज करु शकत नाही हेच खरं..
 विभक्त कुटुंब पध्दती , सोशल मिडीया आणि वेगवेगळ्या गृप्सच्या माध्यमातून अनेकांना मित्र मैत्रीणची गरज लागते.. पूर्वी लागत नव्हती का ?? .. नक्कीच लागत असणार पण त्यावेळी तेवढे exposure नव्हतं म्हणुयात... भावना त्याच ज्या दाबुन ठेवल्या जायच्या आता मोकळेपणाने लोक व्यक्त होतात... गाठीभेटी होतात...प्रेम होतं... मैत्री होते पण तरीही कुटुंबव्यवस्था मजबूत राहायलाच हवी कारण तिथेच आपलं सुख आणि आनंद आहे..पण हाच आनंद तुम्हाला नक्कीच बाहेरही मिळतो पण कुटुंबाला न झिडकारता आपल्याला घेता यायला हवा.. दोन्हीकडे ज्याला बॅलन्स जमला तो आयुष्यभर सुखी झाला.. 
 मैत्री सप्ताह आपण साजरा करतोय. रविवारी मैत्री दिन आहे त्यामुळे आपले कुटुंब हे आपले पहिले मित्र आणि मग आपले मित्र तर हवेतच त्यांच्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही.. मैत्री जपु.. प्रेम जपु आणि कुटुंबही जपु..
   घर आनंदी सुखी समाधानी तर जग सुखी...

Happy friendship Day …
सगळ्या सटव्याना आणि सटवाईला .. असच सगळ्याना हसत ठेव गं बाई..

सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *