गऊळ; शंकर तेलंग
कुरूळा येथील गावांसाठी आणि सामाजिक कार्यात सहभागी असनारे .चंद्रकांत भगवानराव कुरुळेकर
यांनी वाढती महागाई यामूळे होतकरु गरीब कुटुंबातील विद्यार्थीनी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये याकरिता जिजामाता कन्या प्रा.शाळा कुरुळा येथील कु. मेहराज सलीम शेख इयत्ता 3री कु. मोहिनी रामदास येमलवाड इयत्ता 6 वी यांना शैक्षणिक दत्तक घेतले आहे .
विद्यार्थ्यांना ड्रेस स्कूल बॅग वह्या पेना कंपास देऊन येथुन पुढे पण त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च चंद्रकांत कुरुळेकर हे करणार आहेत.
शाळेचे मुअ श्री .राठोड यांनी शाल , श्रीफळ देऊन चंद्रकांत यांचा सत्कार केले तसेच हाती घेतलेल्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण केले !
प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद बाबुराव पांचाळ यांचा सत्कार शाळेचे सहकारी श्री जाधव सर यांनी केले !
चंद्रकांत कुरुळेकर हे पुणे येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत आपल्या गावातील शाळेची त्यांना आवड आहे. सामाजिक कार्य त्यांनी हातात घेतले आहे. यांनी विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन केले !
यावेळी श्रीमती भोसले मॕडम , श्री गंगापुरे सर , श्रीमती कुरुळेकर मॕडम , श्रीमती वारे मॕडम , श्री शंकर तेलंग सर , व श्री.भानुदास थोटे सर बाळासाहेब गीते उपस्थित होते .