कंधार/प्रतिनिधी
येथील श्री शिवाजी हायस्कुल मध्ये दि. २७ रोजी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची (जुक्टा) महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात जुक्टाच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. एस. टी. वडजे तर उपाध्यक्षपदी प्रा. सुभाष वाघमारे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
जुक्टाचे नांदेड जिल्हा निरीक्षक प्रा.कंटीराम लुंगारे व प्रा.रावसाहेब डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारिणीच्या निवडी संदर्भात चर्चा करून तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यात कंधार तालुका महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टाच्या) तालुका अध्यक्षपदी प्रा. वडजे एस. टी., उपाध्यक्ष म्हणून प्रा.सुभाष वाघमारे, प्रा. नागरगोजे जी. के., सचिव म्हणून प्रा.कलमे एस.जी., कोषाध्यक्ष म्हणून प्रा.घोरबांड आर.एम. यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तर कार्यकारणी सदस्य म्हणून प्रा.पवार एस.एस., प्रा.पाटील एस.एस., प्रा.गिरे व्हि. जी.,महिला प्रतिनिधी म्हणून प्रा.रत्नगोले स्वाती प्रभु, प्रा.शेटीवार एस.व्ही., प्रा. तौफिक यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी उपस्थित प्राध्यापकांनी नविन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.