कंधार ; येथिल जगतुंग तलावा मध्ये नांदेड च्या पाच भाविकांच्या मृत्यु झाल्याची हृदय द्रावक घटना घडली. मृत पावलेल्या व्यक्तिच्या कुटूंबाला खासदार यांच्या स्थानिक निधी मधुन अथवा केंद्र शासनाच्या योजने मधुन मदत करावी अशी मागणी एमआयएम कंधार तालुकाध्यक्ष मोहम्मद हामेदोद्दिन अहेमदोद्दिन यांनी निवेदनाद्वारे नांदेड जिल्हयाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना केली .
कंधार हे ऐतिहासिक व पर्यटन शहर घोषीत झालेले असून कंधार शहरा मध्ये किल्ला व दर्गाह असल्यामुळे दर्गाहच्या दर्शनासाठी व किल्ला पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात . नांदेड लोकसभा मतदार संघातील नांदेड येथील पाच भाविक ( १ ) मोहम्मद अब्दुल रहेमान वय १५ वर्षे , ( २ ) सय्यद नविद सय्यद चहिद वय १५ वर्षे , ( ३ ) सय्यद तोहित सय्यद वहिद वय २० वर्षे , ( ४ ) मोहम्मद सफियोदिन मोहम्मद अब्दुल गफुर वय ४५ वर्षे , ( ५ ) मोहम्मद विखारोदिन मोहम्मद फखरोदिन वय २३ वर्षे , हे दिनांक २२/०८/२०२२ रोजी कंधार येथील दर्गाहच्या दर्शनासाठी आले होते .
श्री शिवाजी कॉलेज नवरंगपुरा या भागाकडुन बांधकामा जवळ जेवन करून प्लेट धुण्यासाठी तळ्यावर एक जण गेला असता त्याचे पाय घसरुन तो तळयामध्ये पडला व त्याला वाचण्यासाठी दूसरे वरील चौघेजन गेले असता सर्वजण तळयामध्ये मरण पावले आहेत . वरील पाचजण ही खुप गरीब कुटूंबातील असून वरील मयत व्यक्ति हे एकाच कुटूंबातील असल्यामुळे त्यांचे कुटूंब उघडयावर पडले आहे .
′ वरील लोक हे मयत झाले असल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे . सदरील कुटूंबाचा सहानुभुती पुर्वक विचार करुन वरील मयत व्यक्तिच्या घरच्या व्यक्तिना खासदार निधी मधुन किंवा इतर कोणत्याही केंद्र सरकारच्या योजने मधुन मदत मिळवून द्यावी .
अशी मागणी मोहम्मद हामेदोद्दिन अहेमदोद्दिन एम . आय . एम . तालुका अध्यक्ष कंधार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.