कंधार तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान

कंधार ; तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतदान दिनांक 18 /09/2022 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 रोजी होणार आहे त्यासाठी आज तहसील कार्यालयातून मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी मा उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलीक  व मा व्यंकटेश मुंडे  तहसीलदार कंधार यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले

  •   कंधार तालुक्यातील हणमंतवाडी, रामानाईक तांडा, व आलेगाव या तीन ठिकाणी मतदान होणार आहे व त्यासाठी 50 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

  • तसेच दोन झोन तयार करण्यात आले आहेत. सदरील निवडणूक पार पाडण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलीक साहेब यांच्या नियंत्रणाखाली व तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नयना कुलकर्णी मॅडम, अव्वल कारकून पिराजी जोंधळे, मन्मथ थोटे, हिवाळे, बारकोजी मोरे, कोतवाल श्रीरामे, राखे परिश्रम घेत आहेत .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *