मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त कंधार येथे दिनांक 16 सप्टेंबर रोजी हेरिटेज वॉक ची सुरुवात हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून करण्यात आली
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड सौ . वर्षाताई घुगे यांच्या सूचनेनुसार कंधारर येथे गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर व गटशिक्षणाधिकारी संजय येरम यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 16 सप्टेंबर रोजी कंधार येथे हेरीटेज वॉक करण्यात आला .
हेरिटेज वॉक अंतर्गत शहरातून मोटरसायकल द्वारे रॅली काढण्यात आली महामानवाच्या पुतळ्याना अभिवादन करण्यात आले . या हेरिटेज वॉकचा समारोप कंधार येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे करण्यात आला . यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याना उजाळा दिला .
तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने याच कार्यक्रमाचा भाग म्हणून माजी खासदार व आमदार जेष्ट स्वतंत्र सेनानी भाई डॉ . केशवराव धोंडगे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे प्रतिनिधी ग्रामीण साहित्यिका सौ . चंद्रप्रभावती बाई धोंडगे यांचा सत्कार करण्यात आला . तसेच ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी माजी आमदार भाई गुरुनाथ रावजी कुरूडे , स्वतंत्र सेनानी तथा माजी नगराध्यक्ष रामराव पवार , स्वातंत्र सेनानी पापीनवार यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमास .प्रा डॉ . पुरुषोत्तम धोंडगे , गटविकास अधिकारी सुरेश मांजरमकर , गटशिक्षणाधिकारी संजय येरमे ,अभियंता इंदुरकर , ग्राम विकास अधिकारी गुट्टे , शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर , शिक्षण विस्ताराधिकारी राजेश पांडे , केंद्रप्रमुख माधवराव कांबळे , उद्धव सूर्यवंशी , जयवंत काळे , फुलवळचे केंद्रप्रमुख केंद्रे , एन एम वाघमारे , ग्रामसेवक संघटना कंधार तालुका अध्यक्ष गंगाधर कांबळे , मु अ अनिल वटमवार , कैलास गरुडकर , शंतनु कैलासे , बसवेश्वर मंगनाळे , राजहंस शहापुरे , हरि चिवडे , मंजूर अहमद , मोहम्मद अन्सारुद्दीन , अनंत तपासे , शिवाजी कनोजवार , मगदूम परदेशी , अजर सरवरी , मोमीन जलील , शेख इब्राहिम , आदीसह जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक तसेच कंधार पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने या हेरिटेज वॉक मध्ये सहभागी झाले होते .