कंधार शहरालगत इ.स. नवव्या शतका मध्ये राजा कृष्ण देवराय तीसरा यांनी कंधार शहरास उप राजधानीचा दर्जा देवून भुईकोट किल्ला व जगतुंग सागर ( तलाव) हयांची निर्मीती केली.भुईकोट किल्ला व जगतुंग सागर असा नामोल्लेख इतिहसात आहे. व त्याचे पुरावे सुध्दा उपलब्ध आहे. परंतु प्रशासकीय अधिकार्याने या वास्तुचे नामांतर करण्याचे प्रयत्न चालवले आहेत ते खपवून घेणार नाही तात्काळ प्रशासनाने त्यांची झालेली चूक वेळीच सुधारावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा भाजप च्या वतीने शहराध्यक्ष अॅड गंगाप्रसाद यन्नावार यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार कंधार यांना दिला.
नगर परिषद कंधार च्या वतीने सर्वसाधारण निवडणूक २०२२ वार्ड रचने संदर्भात नकाशा प्रकाशित करण्यात आला त्यावर जगतुंग सागर तलाव ऐवजी त्याचे नाव ‘सरवरे मगदुग तलाव’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. विशेष या नकाशावर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, सहाय्यक शहर रचना अधिकारी यांची स्वाक्षरी आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने कंधार पंचायत समितीच्या वतीने ऐतिहासीक वारसा पदयात्रा चे आयोजन हुतात्मा स्मारक कंधार ते भुईकोट किल्ला कंधार या मार्गावर आयोजित केले होते. त्यात असलेल्या हस्तपत्रक (बॅनर) वर भुईकोट किल्ला ऐवजी सरवरे मगदुग तलाव भोईकोट असा उल्लेख केलेला आहे.
वरिल दोन्ही चुका प्रशासकीय जबाबदार अधिकारी यांच्या वतीने झालेल्य आहेत. हया चुका भविष्यामध्ये वाद निर्माण करणा-या आहेत अशा चुका करणा-यावर योग्य ती कार्यवाही व झालेल्या तात्काळ दुरुस्ती करावे असे निवेदन भाजपाच्या वतीने दिले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड , शहराध्यक्ष अॅड गंगाप्रसाद यन्नावार , ता सरचिटणीस मधुकर डांगे , प्रविण बनसोडे आदीची उपस्थिती होती.