नांदेड ; रमनेवाडी येथील पांडुरंग गोविंद कंधारे यांचे काही दिवसापूर्वी वीज पडून निधन झाले होते त्यांच्या कुटुंबीयांची लोहा,कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांनी भेट घेतली. व शासनस्तरावर आमदार शिंदे साहेबांनी प्रयत्न करून 4 लाख रू चा धनादेश दिला.
तसेच नागदरवाडी येथील संगाबाई तातेराव केंद्रे यांचे काही दिवसापूर्वी वीज पडून निधन झालं त्यांचा पण कुटूंबाची आमदार श्री.श्यामसुंदरजी शिंदे यांनी भेट घेतली. व शासनस्तरावर आमदार शिंदे साहेबांनी प्रयत्न करून 4 लाख रू चा धनादेश दिला .
यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपसभापती श्याम आण्णा पवार, केशवराव तिडके, हाडोळी सरपंच लक्ष्मणराव केंद्रे,बाबुराव केंद्रे,गुणाजी गुरुजी,चेअरमन नागेश खांबेगावकर,सुधाकर सातपुते,सिद्धेश्वर वडजे,राहुल पा.बोरगांवकर,धोंडीबा राम बोईनवाड,उपरपंच निखिल मस्के,मनोज भालेराव,प्रसाद जाधव,तलाठी, सह कार्यकर्ते उपस्थित होते .