शिक्षक महासंघाचे प्रांत उपाध्यक्ष हरीहर चिवडे यांचा कंधार येथे सत्कार

कंधार ; तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रांत उपाध्यक्ष पदी हरीहर चिवडे यांची निवड झाली त्याबद्दल आज शिक्षक महासंघाच्या वतीने येथिल श्री शिवाजी विघा मंदीर येथे कंधार शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कंधार तालुकाध्यक्ष भास्कर पाटील कळकेकर होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी.जी. यांनी करताना सत्कार कार्यक्रमाची भुमिका विषद केली .शिक्षक नेते राजहंस शहापुरे यांनी भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने भुभेच्छा देवून सत्काराला हजेरी लावली .

कंधार महासंघाचे तालुका सचिव बसवेश्वर मंगनाळे यांनी हरीहर चिवडे यांच्या संघटनात्मक बांधणी ची माहिती सांगितली .

 

या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना हरीहर चिवडे यांनी सांगितले की गेल्या तिस वर्षापासुन महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भात ज्या ज्या वेळी आंदोलन , उपोषण झाले यांच्या माध्यमातून तळमळीने शिक्षकांचे प्रश्न माडून महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या अधिवेशन व विविध उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला . शिक्षक महासंघाचे आताही कार्य चालू असून यापुढेही शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे योगदान व मार्गदर्शन राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रांत उपाध्यक्ष पदी हरीहर चिवडे यांची निवड झाली त्याबद्दल आज शिक्षक महासंघाच्या वतीने येथिल श्री शिवाजी विघा मंदीर येथे कंधार शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला .

 

तसेच या निवडी बद्दल माजी प्रांत अध्यक्ष का . र. तुंगार , माजी सचिव प्रकाश देशपांडे , माजी प्रातउपाध्यक्ष जि. एस चिटमलवार , प्रांत अध्यक्ष राजेंद्र निकम, प्रांत महासचिव विठल उरमुडे , प्रांत संघटन मंजी कृष्णा हिरेमठ , प्रांत सदस्य तथा जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव जाधव , जिल्हाध्यक्ष हरीभाऊ चव्हाण , जिल्हा सचिव डाकोरे आदीचे आभार मानले .

 

या कार्यक्रमात सुभाष मुंडे , मंजूर अहेमद ,महमद अन्सारोदीन , श्रीमती उर्मीला जोशी ,श्री शिवाजी विद्यामंदिर प्राथमिक शाळा कंधार येथील शिक्षक एम एम वडजे , एच बी शिंदे , डीएम भालेराव , गजानन धोंडगे , एस पी भोसीकर , सोमासे डी. के , केशव पोतणे, संभाजी कदम आदीची यावेळी उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार सय्यद ईस्माईल यांनी केले .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *