गऊळ से. स. सोसायटी च्या चेअरमनपदी सत्यभामा तेलंग तर व्हाईस चेअरमनपदी माधव मुंडे यांची बिनविरोध निवड..

 

फुलवळ बातमीदार ( धोंडीबा बोरगावे )

फुलवळ पासून जवळच असलेल्या मौजे गऊळ ता. कंधार येथील श्री संत योगीराज निवृती महाराज शेतकरी विकास पॅनलच्या दणदणीत विजयानंतर सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी सत्यभामा संजीवकुमार तेलंग तर व्हाईस चेअरमन पदी माधव नामदेव मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ता. २८ सप्टेंबर रोजी या निवडी करिता निवडणुक अधिकारी म्हणून बी.बी.बोधगिरे , सहाय्यक निवडणुक अधिकारी व्हि.बी.वर्ताळे, व्हि.आर.शेळके यांनी काम पाहिले .

निवडप्रक्रिया पुर्ण होताच नवनिर्वाचित चेअरमन सत्यभामा तेलंग व व्हाईस चेअरमन माधव मुंडे यांचा उपस्थितांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित संचालक बालाजी तेलंग,चुडाजी कागने,बाबाराव तेलंग,गंगाधर पंदेवाड,किशन तेलंग,खंडु देवकांबळे,अनुसया गिरे,गणपत गायकवाड,भगवान गिरे,ज्ञानोबा पांचाळ ,श्रीमती भागुबाई जायभाये यांचाही ग्रामस्थाच्या वतीने सत्कार केला.

यावेळी माजी जि.प.सदस्य बाबुराव गिरे, माजी सरपंच उद्वव तेलंग,उपसरपंच संजीवकुमार तेलंग,सुभाष तेलंग,माजी सरपंच प्रदिप केद्रे,नारायण गुट्टे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच आभार ज्ञानेश्वर तेलंग यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *