कंधार ; दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी गटसाधन केंद्र कंधार येथे कंधार केंद्राची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आले होती. या केंद्रीय शिक्षण परिषदेस गटशिक्षणाधिकारी संजय येरमे , यांच्यासह केंद्रप्रमुख ,केंद्रातील पदोन्नती मुख्याध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक , विशेष शिक्षक उपस्थित होते.
संकुल कंधार येथे झालेल्य केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला सुलभक म्हणून फुलारी मॅडम ,नामवाड मॅडम ,मनिषा वाघमारे ,चोले मॅडम यांनी
विद्याप्रवेश,विद्यांजली पोर्टल , आजादी का अमृत महोत्सव, एक भारत श्रेष्ठ भारत,माता पालक गट,रिट टू मी& तेजस , इ.1ली द्विभाषिकीय पाठयपुस्तक, PGI याविषयी माहिती सांगितली.