फुलवळ मध्ये ईद ए मिलादुन्नबी सामाजिक उपक्रमासह उत्साहात साजरी.

 

फुलवळ  ( धोंडीबा बोरगवे )

कंधार तालुक्यातील फुलवळ येथे ता. ९ ऑक्टोबर रोजी ईद ए मिलादुन्नबी म्हणजेच महोम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तत्पूर्वी ता. ८ ऑक्टोबर रोजी येथील मुस्लिम बांधवानी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गावातील मुख्य रस्त्यावर साफसफाई करून ग्रामस्वच्छतेचा संदेश दिला.

महोम्मद पैगंबर यांचा जन्म ता. २० एप्रिल ५७१ रोजी झाला असल्याचे येथील मौलीसाब कासीम सुरजमिया शेख यांनी दिली. महोम्मद पैगंबर म्हणजे अल्लाह कडून परिपूर्ण ज्ञान प्राप्त करून इहलोकी पाठवलेली ज्ञानी व्यक्ती म्हणले तरी वावगे ठरणार नाही असेही त्यांनी सांगितले. 

महोम्मद पैगंबर हे केवळ इस्लाम धर्मीयांसाठीच नसून प्रत्येक धर्मासाठी शांततेचा व मानवतेचा संदेश देणारे व्यक्तिमत्त्व असून जो कोणी त्यांच्या तत्वाचे पालन करणार नाही तो त्यांचे अनुयायीच नसतील हेच सिद्ध होते असेही त्यांनी सांगितले.

 

 

याच महान संतांची फुलवळ येथे जयंती साजरी करतांना गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन गावात भव्य मिरवणूक काढून सामाजिक सलोखा राखत शांततेत उत्सव साजरा केला. मिरवणुकीत एकमेकांना मिठाई वाटप करत हमसब भाई भाई चा संदेश देत गावकऱ्यांत गोडव्याची भावना जोपासली.

यावेळी लहान थोर मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सामील झाले होते , त्यांना हिंदू बांधवानीही शुभेच्छा दिल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *