कंधार:ब्रह्माकुमारीज उपसेवा केंद्र, कंधार च्या वतीने दसरा निमित्त कंधार शहरवासीयांसाठी चैतन्य देवी झाकीचे आयोजन बालाजी मंदीर, भवानी नगर, कंधार येथे करण्यात आले. त्याच बरोबर व्यसनमुक्ती पर नाटकाने या झाकीची शोभा द्विगुणित झाली.
ब्रह्माकुमारी उप सेवा केंद्राद्वारे दसरा निमित्त चैतन्य देवी झाकीचे आयोजन बालाजी मंदीर येथे करण्यात आले.
या चैतन्य झाकीचे उद्घाटन श्री शहाजी नळगे, अध्यक्ष, बालाजी मंदीर ट्रस्ट,सौ. चित्रलेखा गोरे, भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा (नांदेड ग्रामीण) , ब्रह्माकुमारी शिवकन्या बहेनजी, ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र, नांदेड, ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी, ब्रह्माकुमारीज , उप सेवा केंद्र, कंधार, ब्रह्माकुमार बालाजी भाई, व्यंकट जाधव, पोलीस पाटील, कंधार, डॉ. दत्तात्रय गुडमेवार इत्यादींनी केले.
झाकी बरोबरच व्यसनमुक्ती पर नाटक लहान लहान चिमुकल्यांनी सादर करून सर्वांचे मन आकर्षून घेतले. यात अथर्व मुलूकपाडे, सृष्टी मुलूकपाडे, गौरव, साईनाथ मुलूकपाडे, साईनाथ मुंढे, भारगवी लासे आणि अनुष्का चिवडे इत्यादींनी व्यसनमुक्ती नाटकातील पात्र साकारली .
चैतन्य देवी झाकी मध्ये कु. श्रद्धा मुलूकपाडे , कु. श्रद्धा गारुळे, डॉ. सौ. वर्षा डांगे, कु. सृष्टी मुलूकपाडे आणि राक्षसाच्या भूमिकेत विठ्ठल गारुळे यांनी काम केले.
या कार्यक्रमांतर्गत साईश ढगे, चंद्रकला निकम आणि प्रेमला नरंगले यांनी गीतांचे गायन करून झाकीची शोभा वाढविली.
या चैतन्य देवी झाकीच्या यशासाठी सतिश भाई सोनवणे, श्रीकांत भाई, गणपत भाई, श्याम भाई, प्रथमेश भाई, चीवडे भाई, चंद्रकला निकम, संगीता स्वामी, पल्लवी, मयुरी, इत्यादींनी कठीण परिश्रम घेतले.