पाताळगंगा ग्राम पंचायत बिनविरोध चा निर्णय ; सौ.लक्ष्मी मुंडे सरपंच तर सौ सुरेखा चुकलवाड होणार उपसरपंच …! माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांच्या राजकारणाची गावापासून यशस्वी सुरुवात
पाताळगंगा ग्राम पंचायत बिनविरोध चा निर्णय ; सौ.लक्ष्मी मुंडे सरपंच तर सौ सुरेखा चुकलवाड होणार उपसरपंच …! माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांच्या राजकारणाची गावापासून यशस्वी सुरुवात
कंधार ;प्रतिनीधी कंधार तालुक्यातील पाताळगंगा या गावची ग्राम पंचायत निवडणुक काही महिन्यावर आली आहे.या गावात गेल्या अनेक वर्षापासुन दोन समाजात अंतर्गत मोठा वाद होता.या वादामुळेच गेली चाळी वर्षापासून येथिल निवडणुक अतितटीची होत असते.माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड हे तिन वर्षापासुन जिल्ह्याच नेतृत्व करत असल्याने त्यांनी आपल्या गावातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला दोन समाजाला एकत्र आणुन गावच्या विकासासाठी ग्राम पंचायत बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला आहे.दिनांक 6आॕक्टोबर रोजी गावातील सर्व नागरीकांची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत सौ.लक्ष्मी मुंडे सरपंचतर सौ सुरेखा चुकलवाड उपसरपंच पदावर बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बालाजी चुक्कलवाड यांनी दिली आहे.
पाताळगंगा या गावातील निवडाणुक तिन महिन्यांनी लागणार आहे.या गावात राजकीय डावपेच खेळणारे खिलाडी आहेत.गावात दोन समाजात वाद असल्या कारणाने जातीचे भांडवल करुन निवडणुका लढवल्या जात होत्या.अंतर्गत वादामुळे गावचा कसल्याच प्रकारचा विकास झाला नाही.देशात सर्व काही डिजिटल असताना या गावात साध मोबाईलचे टावर सुध्दा नाही.ज्या ग्राम पंचायतीच्या नावाने निवडणुका लढवल्या जातात त्या ग्राम पंचायतचे मालकीचे कार्यालय सुध्दा नाही.माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड हे सध्या जिल्ह्याच नेतृत्व करत कंधार भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी पाऊले उचलत असल्याने तालुक्यातील शासकीय कार्यालयत त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे.असे असताना गाव मात्र जातीयवादात अडकले असल्याने हे कुठे तरी थांबले पाहीजे या उद्देशाने गावात परिवर्तन घडवण्याचा निर्णय घेतला.गणेश उत्सहाच्या कार्यक्रमात त्यांनी गावकऱ्यांना एकत्र आणले. चाळी वर्ष अंतर्गत वादामुळे गाव विकासापासुन दुर राहिले असल्याचा सल्ला देवुन ऐकमेंकान बद्दल असलेले गैरसमज दुर करण्यात बालीजी चुक्कलवाड यांना यश आले आहे.
निवडणुका तिन महिन्यावर असल्याने पुन्हा वाद नको म्हणून दिनांक 6आॕक्टोबर रोजी संत तुकाराम महाराज मंदिरात गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत चाळीस वर्ष ज्यांनी राजकारण केले त्यांनी घरी बसावे व तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.यामध्ये सौ.लक्ष्मी राजु मुंडे सरपंच तर सौ सुरेखा बालाजी चुकलवाड उपसरपंच पदावर राहतील.श्री ज्ञानोबा नागनाथ मुंडे सदस्य, शंकर गोविंद मुंडे सदस्य , श्री नवनाथ आईतवाड सदस्य,सौ महानंदा बालाजी गुंडाळे सदस्य मारोती नामदेव गंगणपाड सदस्य ,काशीनाथ दिनानाथ घुमे सदस्य हे सदस्य असतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. पाताळगंगा या गावात निवडणुक लागणार नसल्याची माहिती बालाजी चुक्कलवाड यांनी दिली आहे. बिनविरोध निवडणुक होणार असल्याने गावकऱ्यांनमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.