नांदेड दि. 27
कोविड-19 मुळे जगभरात आव्हान निर्माण झाले असून यात सर्व क्षेत्र ढवळून निघाले आहे. भारतात शैक्षणिक परिक्षांचा कालावधी आणि दोन महिन्यानंतर नवे शैक्षणिक वर्षे सुरु होण्याचा कालावधीत हा कोविड-19 च्या चक्रात अडकल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शासनही यात अत्यंत सावधन भुमिका घेत असून नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकल्याव्यात अशी होणारी मागणी रास्त असल्याची भुमिका पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. पालक म्हणून जे काळजीचे वातावरण आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.