डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.

 

कंधार ; भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे डॉ कलाम यांनी लिहिलेली, तसेच त्यांच्यावरील ग्रंथाचे एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक श्री जोगदंड शंकरराव धोंडीबा यांनी पुष्पहार अर्पण केले. तसेच उपस्थित वाचकांनी पुष्प अर्पण केले. यावेळी मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल यांनी डॉ कलाम यांच्या बद्दल माहिती दिली.

 

तसेच ग्रंथप्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घेऊन वाचन प्रेरणा दिन यशस्वी करावा. असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येत वाचकांची उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय कर्मचारी मिलिंद महाराज, किशन भालेराव, श्रीमती कमलबाई जाधव, यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *