पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड जा.क्र. 400/2022 दिनांक: 16.10.2022
1) घरफोडी :
: 1) हिमायतनगर दिनांक 15.10.2022 रोजी 01.00 वा ते 06.00 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे राहते घरी मौजे एकंबा ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी व साक्षीदार आपले घरातील एका रुममध्ये झोपले असता बाजुचे रुमचे दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन स्टीलचे डब्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने एकुण किंमती 1.22,900 /- रूपयाचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला आहे. वगैरे फिर्यादी प्रल्हाद शिवराम आंडगे, वय 30 वर्षे, व्यवसाय शेती रा. एकंबा ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हिमायतनगर गुरन 231/2022 कलम 457,380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि / श्री महाजन, मो.क्रं. 9689707038 हे करीत आहेत.
2) मुक्रमाबाद :- दिनांक 12.102022 रोजी 20.00 वा. ते दिनांक 14.10.2022 रोजी 10.30 वा. चे दरम्यान, धर्मा नगर तांडा जिल्हा परीषद शाळा ता. मुखेड जि. नांदेड येथे, यातील धर्मा नगर तांडा केंद्र बान्हाळी जिल्हा परीषद शाळेचे व अंगनवाडी शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन आतील टि.व्ही. विद्यार्थ्यांना जेवण बनवण्याचे साहित्य, एकुण किमती 42,500 /- रूपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला आहे. वगैरे फिर्यादी प्रकाश ठाकूर चव्हाण, वय 40 वर्षे, व्यवसाय मुख्याध्यापक धर्मा नगर तांडा केंद्र बाऱ्हाळी जिल्हा परीषद शाळा ता. मुखेड जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मुक्रमाबाद गुरन 241 / 2022 कलम 457,380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 2319 सिध्देश्वर, मो.क्रं. 8999881900 हे करीत आहेत.
2) कलम 380 चोरी :
विमानतळ :- दिनांक 14.10.2022 रोजी 23.00 वा. ते दिनांक 15.10.2022 रोजी 06.00 वा. चे दरम्यान, महेबुबनगर येथील उघडया टिन पत्राचेशेडमधुन, नांदेड येथे, यातील फिर्यादीचे उघडया टिन पत्राचे शेडच्या घरामध्ये खिळयाला अडकवून ठेवलेल्या बॅग मधील आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, टि.सी. व इतर शैक्षणिक कागदपत्र व मुलीची कॉलेजची फिस भरण्यासाठी बी.सी. चे उचलेले नगदी 24,000/- रुपये असा माल बॅगसहित कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला. वगैरे फिर्यादी शेख ईस्माईल शेख मन्जूर, वय 45 व्यवसाय अॅटोचालक रा. महेबुबनगर, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे विमानतळ गुरनं 352 / 2022 कलम 380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास
सपोउपनि / श्री लोखंडे, मो.क्र. 9527810006 हे करीत आहेत.
3)मो. 3 ) मो. सा. चोरी :
1 ) वजिराबाद :- दिनांक 29.09.2022 रोजी 15.00 वा. ते 15.30 वा चे दरम्यान, हनुमान ट्रान्सपोर्ट मुरमुरा गल्ली, नांदेड येथे, यातील फिर्यादीची स्पेलंडर प्लस कंपणीची मो. सा. क्र एमएच-26 / एस -4788 किंमती 15,000 /- रूपयाची नमुद ठिकाणावरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली वगैरे फिर्यादी सुभाष धोंडीबा कोल्हे, 30 वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी रा. माहेगाव, ता.जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे वजिराबाद गुरन 365 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना / 412 कानगुलवार, मो.क्रं. 8329585283 हे करीत आहेत.
2 ) भाग्यनगर दिनांक 12.10.2022 रोजी 12.30 वा. चे सुमारास फिर्यादीचे राहते घर काबरा नगर, नांदेड येथे, यातील फिर्यादीची हिरो स्पेलंडर प्लस कंपणीची मो. सा. क्र एमएच-26 / एजी-2170 किमती 40,000 /- रूपयाची नमुद ठिकाणावरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली वगैरे फिर्यादी संभाजी गणेशराव वडजे, 44 वर्षे, व्यवसाय नौकरी रा. काबरानगर, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भाग्यनगर गुरन 372 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोना / 51 जाधव, मो.क्रं. 90679552076 हे करीत आहेत.
3)भाग्यनगर :- दिनांक 08.10:2022 रोजी 03:40 वा. चे सुमारास फिर्यादीचे राहते घर माणीक नगर, नांदेड येथे, यातील फिर्यादीची हिरो कंपणीची मो. सा. क्र एमएच-26 / यु-4725 किंमती 10,000 /- रूपयाची नमुद ठिकाणावरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली. वगैरे फिर्यादी राजाराम शावजी देशमुख, 68 वर्षे, व्यवसाय शेती रा. माणीकनगर, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भाग्यनगर गुरन 373 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 81 बंडेवार, मो.क्रं. 9923103778 हे करीत आहेत.
4) चोरी :
1) अर्धापूर :- दिनांक 15.10.2022 रोजी 14.00 वा. चे सुमारास, फिर्यादीचे आखाडयाजवळ उमरी ता. अर्धापूर जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचे शेतातील अर्धे पोते सोयाबीनचे अंदाजे वजन 30 किलो किंमती 2,000/- रूपयाचे यातील नमुद चोरट्याने पोत्यात भरुन त्यांची मो.सा. क्र. एम.एच. / 26- एस- 4768 वर चोरुन घेवून जात असताना मिळुन आला. वगैरे फिर्यादी मुंजाजी मारोतराव गुंडले, वय 45 वर्षे, व्यवसाय शेती रा. उमरी ता. अर्धापूर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे अर्धापूर गुरनं 290 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना / 1279 चव्हाण, मो.क्रं. 9356283717 हे करीत आहेत.
2) वजिराबाद :- दिनांक 13.102022 रोजी 17.00 वा. ते 17.30 वा. चे दरम्यान, बसस्थानक, नांदेड येथे, यातील फिर्यादीचा सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा मोबाईल किंमती 7000 /- रुपयाचा व आईच्या गळयातील मंगळसूत्र किमती 20,000/- रुपयाचे असा एकुण 27,000 /- रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला. वगैरे फिर्यादी विठ्ठल शंकरराव वानखेडे, वय 34 वर्षे, व्यवसाय नौकरी रा. वरवट ता. हदगाव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे वजिराबाद गुरनं 366 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 1012 राठोड, मो.क्रं. 9970757740 हे करीत आहेत.
5) जनावर चोरी :
मुखेड :- दिनांक 09.10.2022 रोजी 19.00 वा. ते दिनांक 10.10.2022 रोजी चे दरम्यान, फिर्यादीचे शेतात मौजे वर्ताळा ता. मुखेड जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचे दोन बैल किंमती 1,15,000 /- रुपयाचे कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरुन नेले वगैरे फिर्यादी एकनाथ विट्ठल डावखुरे वय 40 वर्षे, व्यवसाय शेती रा. वर्ताळा ता. मुखेड जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे मुखेड गुरनं 306 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 1285 गिते. मो. क्र. 8805957400 हे करीत आहेत.
6) विवाहीतेचा छळ :
शिवाजीनगर :- दिनांक 30.12.2021 रोजी 20.00 वा. ते 15.102022 रोजी 20.00 वा. चे दरम्यान, जयभीमनगर नांदेड ह.मु. आंबेडकरनगर, नांदेड येथे, यातील नमुद दोन आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादी बाईस कापड दुकान टाकण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेवून ये म्हणुन शिवीगाळ करुन मारहाण केली व तिचा शारिरिक व मानसिक छळ केला वगैरे फिर्यादी 19 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे शिवाजीनगर गुरनं 381 / 2022 कलम 498 (अ),323,504,506,34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना / 131 मुंढे, मो.क्रं. 9923595438 हे करीत आहेत.
7)अपघात :
कुंटूर :- दिनांक 11.10.2022 रोजी 20.00 वा. चे सुमारास मौजे कुष्णूर नांदेड ते नायगाव हायवे रोडवर ता. नायगाव जि. नांदेड येथे, यातील मयत नामे श्रीनिवास मुरलीधर काशेटवार वय 50 वर्षे रा. कहाळा बु. ता. नायगाव जि. नांदेड यांना यातील नुमद आरोपी मो.सा. क्र. एम. एच. / 26 – बी. व्ही. – 6018 चा चालकाने त्याचे ताब्यातील मो.सा. हयगय व निष्काजीपणे, भरधाव वेगात चालवुन मयत यांचे इलेक्ट्रीक स्कुटीला पाठीमागुन जोराची धडक मारुन त्यांचे मरणास कारणीभूत झाला व स्वतःची मो.सा. घेवून पळुन गेला. वगैरे फिर्यादी नामदेव जनार्दन गादेवार वय 43 वर्षे व्यवसाय व्यापार रा. मरवाळी ता. नायगाव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कुंटूर गुरनं 169 / 2022 कलम 279,304 (अ) भादवी सह कलम 134 / 177 मो. वा. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि / श्री अटकोरे, मो.क्र. 8669182128 हे करीत आहेत.
8 ) गळफास घेवुन मृत्यु :
नायगाव :- दिनांक 15.10.2022 रोजी 13.30 वा. ते 14.00 वा. चे दरम्यान, स्वतःचे घरी मौजे नरंगल ता. नायगाव जि. नांदेड येथे, यातील मयत नामे प्रदीप मुकुंद पटेकर, वय 30 वर्षे, व्यवसाय शेती रा. नरंगल ता. नायगाव जि. नांदेड, यांनी सतत नापीकी होत असल्याने व संसार चालविणे अवघड होत असल्याने ते सतत विचारात राहत होते व शेतीवर कर्ज कसे फेडावे म्हणुन त्यांनी गळफास घेवुन आत्महत्या केली वगैरे खबर देणार शिवाजी मुकुंद पटेकर, वय 28 वर्षे, व्यवसाय शेती रा. नरंगल ता. नायगाव जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टे नायगाव आ मृ. 38/2022 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि / श्री आनंदा किशन वाघमारे, मो.नं. 9096618261 हे करीत आहेत.
9) विज पडुन मृत्यु :
रामतीर्थ :– दिनांक 14.10.2022 रोजी 16.30 वा. चे सुमारास, मौजे चिटमोगरा खंडोबा मंदिराजवळ रस्त्यावर चिटमोगरा ता. बिलोली जि. नांदेड येथे, यातील मयत नामे हुलूबाई लक्ष्मण काळेकर, वय 50 वर्षे, रा. चिटमोगरा ता. बिलोली जि. नांदेड, ही शेतात काम करुन घराकडे येत असताना अचानक अंगावर विज पडून जागीच मरण पावली. वगैरे खबर देणार विजय रामराव काळेकर, वय 30 वर्षे, व्यवसाय शेती रा. चिटमोगरा ता. बिलोली जि. नांदेड यानी दिलेल्या खबरीवरून पोस्टे रामतीर्थ आ. मृ. 27 / 2022 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना / 1371 शिंदे, मो.नं. 9552524548 हे करीत आहेत.