कै .संभाजीराव पाटील गिरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण रुग्णालय कंधार येथे रुग्णांना फळ वाटप

कंधार ; शंकर तेलंग प्रतिनिधी

दिनांक 22 10 2022 रोजी श्री संत निवृत्ती महाराज विद्यालय भवानी नगर कंधार या शाळेचे संस्थापक आदरणीय कै .संभाजीराव धोंडीबा पाटील गिरे यांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण रुग्णालय कंधार येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ वकील साहेब धोंडीबा पाटील पवार सेवानिवृत्त फॉरेस्ट अधिकारी मधुकर पाटील तेलंग . डॉ रणदिवे , डॉ गुडमेवार , श्री संत निवृत्ती महाराज शिक्षण प्रसारक मंडळ गौळ या संस्थेचे सचिव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव पाटील गिरे , डॉ जाधव साहेब डॉ केंद्रे साहेब डॉ तेलंग साहेब डॉ कदम साहेब , शाळेचे मुख्याध्यापक श्री बी व्ही शिंदे , शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . यावेळी बोलताना बाबुराव गिरे महणाले की दवाखान्यामध्ये बघितले असता एकदम स्वच्छता आढळून आली आणि कर्मचाऱ्यांची उपक्रमाची स्तुती केली पूर्ण दवाखान्यामध्ये एकदम स्वच्छता असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व्यक्त केले व सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *