कंधार : ग्रामीण रुग्णालय कंधार येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न आणि निवासी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे भेट.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग,नांदेड जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 205 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
दिनांक:-21/10/22 रोजी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” या अभियानाविषयी महिलांना आरोग्य बद्दल माहिती सांगुण मार्गदर्शन केले व सर्व महिलांनी आरोग्य तपासण्या करून घेण्याचे आवाहन केले.या अभियान विषयी माहितीचे वाचन व कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ.शाहीन बेगम यांनी केले. “माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” या कार्यक्रमाचे उद्घाटन तपासणिला येणाऱ्या माताच्या हस्ते करण्यात आले तपासणी आलेली माताचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले सौ.संगीताताई सोनाजीराव बनसोडे यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी
डॉ.महेश पोकले (दंत शल्यचिकित्सक ) यांनी महिला सुरक्षित तर घर सुरक्षित या विषयी महिलांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू टोम्पे (स्त्रीरोग तज्ज्ञ) यांनी महिलांना असणाऱ्या आजाराविषयी माहिती सांगितली व त्यांना महिलांनि न लाजता आपले आजार डॉक्टरांना सांगून त्यावर वेळीच इलाज केला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नम्रता ढोणे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करून घाव्यात असे आपले मनोगत व्यक्त केले.
सदरील अभियानात 18 वर्षावरील सर्व महिला गरोदर माता,यांची सर्व महिलांची वैद्यकीय आरोग्य तपासणी ( रक्तदाब स्क्रीनिंग, मधुमेह, स्क्रीनिंग,हिमोग्लोबिन स्क्रीनिंग,दंतचिकित्सा स्क्रीनिंग रक्तक्षय स्क्रीनिंग तसेच कर्करोग स्क्रीनिंग.30 वर्षावरील सर्व महिला व बालकांचे लसीकरण प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा देण्यात आल्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ.शाहीनबेगम यांनी केले.
*”आकस्मित भेट”*
तसेच आज दि:-21/10/2022 रोजी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांच्या उपस्थित निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात आकस्मित भेट देऊन कर्मचाऱ्यांना चकीत केले व रुग्णालयाची पाहणी केली.
सायंकाळी ठिक 05:00 वा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.महेशकुमार माने साहेब व त्यांच्यासोबत नांदेड जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हाचे कासमन्वयक श्री.अनिल कांबळे साहेब हे होते निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली .सर्व वॉर्डातील स्वच्छता हॉस्पिटल ची स्वच्छता आसपासचा परिसर स्वच्छता रेकॉर्ड अद्यावत असावेत असे सूचना दिल्या प्रसूती ग्रह स्वच्छता, ऐकलंमसिया जनरल वार्ड , प्रसुतीपश्चात वॉर्ड , शस्त्रक्रिया गृह, सर्व वार्डातील परिसर स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले.