मोजणी कामाच्या जलद निपटाऱ्यासाठी भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप

 

नांदेड  दि. 21 :- संचालक भूमि अभिलेख पुणे यांच्या पुढाकाराने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप प्राप्त झाले आहेत. जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस.पी.सेठीया यांचे हस्ते प्राप्त 22 लॅपटॉपचे वितरण प्रातिनिधिक स्वरूपात नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील नऊ अधिनस्त उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी, भूकरमापक व निमतानदार/परीरक्षण भूमापक यांना आता लॅपटॉप उपलब्ध झाल्याने कामाचा जलद गतीने निपटारा करता येणे शक्य झाले आहे.

ईटीएस व रोव्हर मशिनने केलेले मोजणी काम अचुक व जलद नोंदविला जाईल. कार्यालयात प्राप्त मोजणी प्रकरणात मोजणी करुन हद्दीखुणा देणेची कार्यवाही त्याच दिवशी करणे सोईचे होईल. याचबरोबर ड्रोनद्वारे गावठाण भुमापन केलेल्या गावांचे पुढील कामकाज करणे व इपीसीएसद्वारे नगर भुमापनकडील ऑनलाईन फेरफार घेणे याकामी याचा उपयोग होईल असे श्रीमती एस.पी.सेठीया यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *