कंधार. लोहा तालुक्यातील धावरी येथे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या माधव डूबुकवाड यांच्या परिवारास वंचित बहुजन आघाडीचे वतीने भेट देण्यात आली.
कंधार तालुक्यातील पानभोसी येथील माधव डुबुकवाड हा ऊस तोड कामगार आपल्या कुटुंबासह लोहा तालुक्यातील धावरी या गावी ऊसतोड कामासाठी गेले होते. दरम्यान अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट पावसास सुरुवात झाली. या दरम्यान ऊसतोड करणाऱ्या कामगारावर वीज पडली. ज्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. यात एका लहान बालकेसह दोघांचा समावेश होता. या दुर्देवी घटनेत पानभोसी येथील माधव डुबुकवाड या ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला होता. सोबत असलेली त्यांची मुलगी ही या घटनेत गंभीर जखमी झाले असून ती नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवभाऊ नरंगले यांनी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी घटनेच्या ठिकाणी जाऊन भेट दिली होती. दरम्यान जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी व त्यांचे सहकार्याने प्रयत्न केले होते.
या घटनेत मृत्य मुखी पडलेल्या माधव डुबुकवाड यांच्या कुटुंबीयास आज वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद, जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले, महासचिव शाम कांबळे, कंधार तालुक्याचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे जिल्हा उपाध्यक्ष खंडूजी अकोले, प्रवीण कछवा, सुनील सोनसळे, शुक्लोधन गायकवाड, पानभोसी गावातील ग्रामपंचायत सदस्य उत्तम नाईकवाडे, ईसांबर डुबुकवाड ,शेख पाशाभाई, मोहम्मद साहब, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव नाईकवाडे, विसांबर भोंग, ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव जोंधळे यांच्यासह गावातील पदाधिकारी यांनी भेट देऊन डुबुकवाड कुटुंबाचे सांत्वन केले. या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आर्थिक मदतही करण्यात आली.
या दुर्दैवी घटनेत वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबासोबत असून या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन राज्य प्रवक्ते फारूक अहमद व जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले यांनी दिले.