मुखेड पेठवडज रोडवर कार आडवून जबरी चोरी

कंधार  दिनांक 24.10.2022 रोजी 21.00 वा. ते 21.30 वा. चे दरम्यान, मुखेड ते पेठवडज रोडवर गणपती गडगम यांचे शेती जवळ पेठवडज ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी व त्याची पत्नी व त्यांची दोन वर्षाची मुलगी असे मिळुन त्यांचे दुकानाची पुजा करुन त्यांची कार क्र. एम. एच. / 26- व्ही -6117 ने नमुद ठिकाणावरुन येते असताना यातील अनोळखी चार इसमांनी कारचे दोन्ही बाजू कडुन दगडफेक करुन दोन्ही बाजूस मोटार सायकल आडव्या ठेवून फिर्यादीस डोक्यात दगडाने उजव्या कानाचे वरती मारुन जखमी करुन सोन्याचे लॉकेट, सोन्याची अंगठी व पत्नीच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र, रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकुण किंमती 73,000/- रुपयाचा माल जबरीने चोरून नेला. वगैरे फिर्यादी प्रदीप शिवाजीराव नाकाडे, वय 31 व्यवसाय व्यापार रा. पेठवडज ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे कंधार गुरनं 325 / 2022 कलम 394,392,341, 427, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोनि / श्री आर.एस. पडवळ, मो.क्रं. 9420841070 हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *