बाचोटी सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळ अध्यक्षपदी रमेश धोंडगे
कंधार : तालुक्यातील बाचोटी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळ अध्यक्षपदी रमेश केशवराव धोंडगे तर प्रशासकीय मंडळ उपाध्यक्ष आनंदा जळबा धोंडगे आणि प्रशासकीय मंडळ सदस्य श्रीराम नरसिंग डुबूकवाड, जयसिंग हाणमंत दुरपडे, संतोष नारायण दुरपडे म्हणून आदिची निवड करण्यात आली .
साई सुभाष भवन नांदेड येथे मा. जिल्हाधिकारी साहेब, नांदेड , डि. डि. आर. यानी मा. खासदार प्रतापरावजी पा. चिखलीकर यांच्या शिफारशीनुसार केली आहे.
निवडी बदल काशीनाथ दुरपडे, शिवशंकर धोंडगे, जगनतात्या धोंडगे, तिरुपती धोंडगे, भगवान जबडे, खडे पठाण, रघुनाथ धोंडगे, संभाजी हसनवाड, किशन वाघमारे, बालाजी वाघमारे आदिनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .