डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन

 

कंधार ; प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवीन दिवाळी अंक २०२२ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहेत.

 

 

यावेळी सर्वप्रथम श्री जोगदंड शंकरराव , पत्रकार सचिन मोरे यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे पूजन करण्यात आले. मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल दिवाळी अंक विषयी माहिती दिली. तसेच सदरील प्रदर्शनाचे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. सदरील प्रदर्शन दिनांक 4/11 /2022 ते 7/11/ 2022 असे राहील.

 

 

यावेळी मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. दिवाळी अंक प्रदर्शनासाठी ग्रंथालय कर्मचारी दत्ता ऐनवाड, मिलिंद महाराज, किशन भालेराव, श्रीमती कमलबाई जाधव यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *