Post Views: 53
नांदेड ;क्रिकेट विश्वचषकातील सर्व सामन्याचे प्रक्षेपण अतिशय स्पष्ट व भव्य पाहून स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद लुटत शेकडो क्रीडा रसिकांनी प्रचंड प्रतिसाद देत कलामंदिर मध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी लावलेल्या मोठ्या पडद्यावर सामना पाहण्याचा आनंद लुटला.
भाजपा नांदेड महानगर व कलामंदिर ट्रस्ट तर्फे
हिंदुस्तान विरुद्ध बांगलादेश हा सामना मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा शुभारंभ प्रतिष्ठित उद्योजक सतीश सुगंचदजी शर्मा यांच्या हस्ते तर प्रतिष्ठित व्यापारी योगेश जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा सरचिटणीस विजय गंभीरे ,अशोक पाटील धनेगावकर, व्यंकट मोकले, मंडलाध्यक्ष आशिष नेरळकर, भालचंद्र पत्की, सूर्यकांत कदम ,मारोतराव वाघ, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष परळीकर, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस अनिल बोरगावकर, कामाजी सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्याचा दर्शकांनी पुरेपूर लाभ घेतला. भारताच्या प्रत्येक चौकार आणि षटकाराला प्रचंड दाद दिली. पावसामुळे व्यत्यय येईपर्यंत बांगलादेशचे पारडे जड होते. पण नंतर टिचून गोलंदाजी करून मिळवलेल्या प्रत्येक बळींचे स्वागत करताना नाचून सभागृह डोक्यावर घेतले. अंतिम चेंडूवर झालेल्या भारताच्या विजयाचे शेकडो क्रीडा रसिकांनी प्रचंड जल्लोषात स्वागत केले.तिरंगे झेंडे हातात घेऊन अनेक जण उत्साहात भांगडा करत होते. सामना संपल्यानंतर कलामंदिर परिसरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली.
यापूर्वी हिंदुस्तान विरुद्ध नेदरलँड हा सामना देखील मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला होता.त्याचा शुभारंभ भाजपा मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी विरोधी पक्ष नेते दीपकसिंह रावत हे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धणेगावकर व व्यंकट मोकले, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी व शितल खांडील,कामाजी सरोदे, भास्कर हंबर्डे,प्राचार्य बालाजी गिरगावकर, शंकरराव मनाळकर,अनिल जगताप हे उपस्थित होते.
हा सामना जिंकल्यामुळे क्रीडा रसिकांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेला भारताचा थोडक्यात झालेला पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला. या सामन्याचे उद्घाटन भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉक्टर सचिन उमरेकर यांच्या हस्ते व नगरसेवक दिलीपसिंग सोडी यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्षेपण करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रभू कपाटे, बालाजी गिरगावकर,चक्रधर उमरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सामने दाखवण्यासाठी आशिष मेश्राम, प्रवीण सुनेवाड, संतोष भारती, प्रदीपसिंह हजारी, धीरज स्वामी, कपिल यादव, करण जाधव, सदाशिव कंधारे, सुनील वाघमारे, महेंद्र शिंदे, आकाश गायकवाड, विलास जोगदंड, विजय वाडेकर हे परिश्रम घेत आहेत.रविवार दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्यात येणार आहे.कलामंदिर मध्ये आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे क्रिडाप्रेमी
नागरिकांनी व तरूणांनी वेळेवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.दिलीप ठाकूर व कामगार आघाडीचे सुरेश लोट यांनी केले आहे.