तुम्ही जे काही करीत आहात त्यापेक्षा शंभर पट अधिक चांगले कार्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती तुमच्यातील अप्रकट शक्ती, जिद्द आणि ठराविक दृष्टिकोन याची जाणीव होण्याची. केवळ बाहेरच्या मदतीच्या बळावर आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकत नाही, त्यासाठी तुम्हालाच तुमचे ध्येय निश्चित करून प्राप्त करावे लागेल..!
ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात महत्वपूर्ण उद्धिष्ट गठायचे असते, यशाच्या शिखरावर आपला झेंडा रोवायचा असतो त्याने येणाऱ्या प्रत्येक संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी सदैव तयार असले पाहिजे. जीवनात उद्धभवलेल्या प्रत्येक संकटाकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. ध्येयप्राप्तीचा ध्यास घेऊन सतत त्या दृष्टीने कार्यक्षम राहिल्यास म्हणजेच “ध्येयवेडे” झाल्यास यश तुमचेच आहे..!
इंटरनॅशनल बेस्टसेलर स्वेट मार्डेन लिखित, यश आणि व्यक्तिमत्त्वविकास यांची सांगड घालणारे, “ध्येयवेडे व्हा” हा ग्रंथ प्रा. शिवाजी सूर्यवंशी सर यांनी मला स्थळ: नमस्कार चौक नांदेड येथे भेट दिला. उपक्रमशील व्यक्तिमत्त्व म्हणून माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन माझा सन्मान करण्यात आला. यावेळी, दिलीप खंडगावकर सर, राम जेठे यांनी उपस्थित होते..!