लोहा, कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी काल नियोजन भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येत असलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याच्या कामासाठी 75 लक्ष रुपयाचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली, यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा निधी मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले, आशिया खंडातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडेरायाच्या यात्रेत दरवर्षी घोडे उंट व इतर पशु यात्रेत हजारोच्या संख्येने दाखल होतात या पशूंना तात्काळ दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी माळेगाव यात्रेत अत्याधुनिक यंत्रणेचे भव्य पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याची मागणी यावेळी आमदार शिंदे यांनी करून गेल्या दोन वर्षापासून माळेगाव यात्रा कोरोनाच्या संकटात झाली नसल्याने यावर्षी माळेगाव यात्रेचे वैभव वाढवण्यासाठी शासनाने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार शिंदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. मतदारसंघातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी सहकारी बँकांना पिक विमा ची रक्कम वाटपासाठी दिली जाते पण या सहकारी बँकाकडे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विम्याच्या रकमेसाठी बँकेच्या चकरा माराव्या लागत असल्याने पीक विमा शेतकऱ्यांना वेळेत व सुलभ मिळण्यासाठी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना बँकेतून पिक विम्याची रक्कम सुलभ व सहज मिळण्यासाठी व इतर उपाययोजना करून बँकेच्या व्यवहारात सुधारणा करण्याची मागणी आ. शिंदे यांनी केली, मतदारसंघात शेतकऱ्यांच्या शेतीचा वीज पुरवठा सुरळीत होत नाही झालाच तर कमी दाबाने वीज पुरवठा होतो तर अनेक शेतकऱ्यांना नवीन डीपी साठीचे कोटेशन भरूनही वेळेवर डीपी उपलब्ध होत नाहीत, डीपी जळाला तर आईल चा तुटवडा भासतो या व इतर विजेच्या विविध समस्येमुळे मतदार संघातील शेतकरी त्रासून गेला असून शेतीचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ते उपाय योजना करून मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ही आमदार शिंदे यांनी यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे, जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर दुपारी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या नांदेड येथील स्मेरा निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्यां सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत दादा शिंदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार केला व लोहा कंधार मतदारसंघातील विविध विषयावर सखोल चर्चा केली, यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य रोहित पाटील शिंदे,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, सरपंच अवधूत पाटील शिंदे, सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, शेख शेरू भाई, सरपंच पंजाब पाटील माळेगावे, माजी सरपंच पप्पू भुरे, उपसरपंच हनुमंत पाटील जाधव, बालाजी इसाद कर, गिरीश डिगोळे ,अशोक बोधगिरे, शुभम कदम सह कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.