सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी 20 नोव्हेंबर पूर्वी बँकेची संपर्क साधावा ; नांदेड जिल्हा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी जेष्ठ नागरिक संघटना तालुका शाखा कंधार यांचे आवाहन

कंधार ; कंधार तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांची बैठक पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष महंमद हमेदोदिन यांचे अध्यक्ष खाली प्रियदर्शनी हायस्कूल कंधार  येथे पार पडली .

यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत बँकेत आपली स्वाक्षरी स्वतः करावी तसेच ज्या कर्मचाऱ्यांना बँकेपर्यंत जाता येत नाहीत अशा कर्मचाऱ्यांनी फॉर्मवर अंगठा देऊन बँकेत सादर करावा व संघटनेचे ज्येष्ठ नेते ज्ञानोबा मंगनाळे यांच्या 95 0 33 28 478 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी ज्ञानोबा मंगनाळे ,नारायण पटणे ,शंकरराव गोरे, गुलाम मुक्तार, परशुराम शिखरे, मीरा खान आदी उपस्थित होते .

सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी अत्यंत आजारी आहेत ते कर्मचारी बँकेत येऊ शकत नाहीत सही करता येत नाही आशिया कर्मचाऱ्यांनी फॉर्मवर आणते करून बँकेत सादर करावे व बँकेला येऊन पेमेंट उचलता येत नाही असे कर्मचाऱ्याने या संघटने कडे माहिती द्यावी अशा कर्मचाऱ्यांच्या घरी बँकेमार्फत सेवानिवृत्ती वेतन वाटप करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *