कंधार ;पेठवडज येथिल परफेक्ट इंग्लीश स्कूल चा स्काॅलरशिपचा निकाल पुन्हा एकदा परफेक्ट लागला त्या मध्ये पाचवी व आठवी वर्गातील ५४ विद्यार्थी शिष्यवृतीसाठी पात्र झाले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गिरधारी जी केंद्रे आणि संस्थेचे सचिव गोविंद केंद्रे यांनी दिली .
पेठवडज येथिल परफेक्ट इंग्लीश स्कूल आतापर्यंत तब्ब्ल 63 विद्यार्थी नवोदय साठी पाठवणारी , सातारा व चंद्रपूर सैनिक स्कूल साठी 21 पात्र स्काॅलरशिप मध्ये शिष्यवृत्तीधारक 142 झाले आहेत
या वर्षी 5वीचे 43मुले त्यात 200 मार्क घेणारे विद्यार्थी 34विद्यार्थी 174 च्या वर घेणारे 9विद्यार्थी तसेच 8वी स्काॅलरशिप परीक्षेत 11 विद्यार्थी पात्र झालेत त्यात 172वर घेणारे 10 विद्यार्थी आहेत .
पाचवी व आठवीचे 54विद्यार्थी पात्र झाले आहेत म्हणजे परफेक्ट इंग्लीश स्कूल चा स्काॅलरशिपचा 100% निकाल लागला आहे.
महाराष्ट्रातील एकमेव शाळा म्हणजे पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूल या वर्षीचे सर्व म्हणजेच 54विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होतील असा आम्हाला विश्वास आहे असे सचिव गोविंद केंद्रे यांनी सांगितले .
कोरोना महामारी मुळे शाळा, क्लासेस बंद असल्यामुळे पालक विद्यार्थी शिक्षक चिंतित होते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये असे सर्वांना वाटत होते. ऑन लाइन क्लासेस सुरू झाले. त्यात अनेक अडचणी होत्या. या सर्व अडचणींवर मात करत परफेक्ट इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले.
नुकताच जाहीर झालेल्या स्काॅलरशिप परीक्षेचा निकालांमध्ये पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री गिरधारी जी केंद्रे सर आणि संस्थेचे सचिव श्री गोविंद केंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व तसेच कंधार चे गटशिक्षणाधिकारी, पेठवडज बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी येरमेसर, केन्द्र प्रमुख मोरे सर, विरभद्र जाधव सर परफेक्ट इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा पवार (हिवराळे) रेखाताई पोतदार , मुरलीप्रसाद वैद्य, अशोक तेंलग, राहुल किनवाड, सुनिल पाटील ,चिटकुलवार एस डी,लोहबंदे सर,राचवाड कोमल, सुर्यवंशी सर, आगलावे मिस,लक्ष्मी मीस, आगलावे सर,पवार सर,बेतेवाड मॅडम,पारडे वैशाली ,गजभारे मिस,शिन्दे भगवान सर, दिक्षीत मिस, तेलंग मॅडम, सोनकांबळे मॅडम, वैद्य मिस, सोनाली करेवाड,कपाळे सर,कुठेकर मॅडम, पाटिल मॅडम,शेख नाजीया मिस,यरावार मीस,इगोले मिस,लश्करे सर,यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले .