अचानक एका मित्राची भेट झाली. भेटीप्रसंगी नमस्कार झाला पुढे मित्राला सोबत घेऊन चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो. तिथं गेलं तर नुसती गर्दीच गर्दी प्रत्येकाच्या समोर चहाचा कप दिसत होता. गप्पा गोष्टी मधून त्यांचा आनंद मात्र वेगळाच जाणवत होता. माणसं जशी जशी मोठी होतात ना , तेवढीच ती समजदार पण होतात हे मात्र खरं आहे. आपलेपणा त्यांच्या अंगी येतो आणि मी पणा मात्र बाहेर निघून जातो. आजकाल माणसातला संवाद हरवल्या सारखा पाहायला मिळतो. कारण माणूस एवढा व्यस्त झाला आहे की, कोणासाठी त्याला वेळ नाही. आणि स्वतःसाठी काय करतो हा तिळमात्र मेळ नाही..!
स्वतः बरोबर इतरांच्या सहवासात राहून मनमोकळ्या गप्पा आणि संवाद कशाच्या माध्यमातून करता येईल तर ते म्हणजे चहा होय चहाच कारण सकाळी उठल्यावर आपल्याला लागतो तो पण चहा, मित्र परिवार, नातेवाईक, यांच्या भेटीप्रसंगी काय लागतो तर ते म्हणजे चहा, ऑफिसच्या खुर्चीवर बसून थकवा जाणवला तर काय लागतो तर ते म्हणजे चहा, डोकं काम करत नाही. फुल टेन्शन डोकं हलकं आणि मन बोलकं करायचं असेल तर काय लागतो तर ते म्हणजे चहा, रात्रभर अभ्यास करायचा पण झोप येणार नाही. अशी जादू कोणती तर ते म्हणजे चहा..!
खरंच सकाळपासून ते झोपेपर्यंत माणसाला चहा लागतो. म्हणून माणूस हा कायमस्वरूपी आनंददायी जगतो. चहामुळे अनेकांचे वाद मिटले, चहामुळे अनेकांच्या चर्चेला उधाण आले. चहामुळे अनेकांना माणसं जोडता आली. चहामूळे अनेकांना माणसातले वाद सोडता आले. चहामुळे नसेच्या व्यसनाला दूर करता आले. चहामुळे सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग एका ठिकाणी बसून सांगता आले..!
खरंच चहामध्ये किती गोडवा आहे..!
एक साधी गोष्ट तिला महत्व प्राप्त करून का दिलं जातं. तर त्या गोष्टीमध्ये इमानदारीची क्षमता कायमस्वरूपी टिकून राहिली जाते. तिला छोट्या पडद्यावर सुद्धा मोठं आव्हान म्हणून सुद्धा आपल्याला पाहता येत. अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटून उठणाऱ्या सशक्त भावनेच्या भरात ज्यांनी छोट्या माणसाला सुद्धा मान-सन्मान मिळवून दिला. हे सर्व कोणाच्या साहाय्याने तर प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या चहातील गोडवा या साखरेच्या पाकातुन ही सर्व माणसं कमावली आणि ही माणस कायमस्वरूपी टिकवून ठेवणारा एकच जल्लोष तो म्हणजे चहातील गोडवा चहा..! ☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕
लेखक – युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड..! ☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕