नांदेड येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी..!

 नांदेड ;बिरसा मुंडा यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांनी आदिवासी समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य केले. आदिवासी हक्क, स्त्री स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी जीवनभर संघर्ष करत आदिवासींमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक : 15 नोव्हेंबर 2022 रोजी. जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. व्ही. बी. आडे यांच्या हस्ते करण्यात आले. आणि कार्यालयात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली..!

यावेळी,
एम. एस. मुळे, एस. जे. रणभीरकर, संजय पाटील, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, सुनील पतंगे, संदीप सूर्यवंशी यांची उपस्थिती होती..!

 

वृत्त संकलन

– सोनू दरेगावकर, नांदेड..!

दिनांक: 15 नोव्हेंबर 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *