श्री गुरुसेवा पॅनल ला सभासदांचा उदंड प्रतिसाद         

नांदेड – जिल्हा सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्या. जि. प. नांदेडची पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. या पॅनलचे प्रमुख संतोष अंबुलगेकर  यांच्या नेतृत्वाखाली व शिक्षक भारतीचे चंद्रकांत कुनके , प्रहारचे मल्लिकार्जुन जोडराणे , आनंद पवार मित्र मंडळ , संतोष कदम मित्र मंडळ , नईम शेख आस संघटना , पती -पत्नी एकत्रीकरण काळेवाड सर , भिंगोले प्रशांत , जुनी पेन्शन कृती समिती व शिक्षक सहकार  रवि ढगे , मारोती लंगोटे , गोविंद आलेटवाड , गजानन भेलोंडे , देविदास जमदडे ,  महिला आघाडीच्या  कुलकर्णी डम , शिक्षकसेनेचे महिला संघटक शिवपुजे सरला , खांडरे सुकन्या  , राष्ट्रपती / व राज्य पुरस्कार माध्यमिक शिक्षक संघटनेचे डॉ. हेमंत कार्ले , स्वाभिमानी संघटनेचे सतिश सोनटक्के , जिल्हाध्यक्ष जावेद खान , केंद्रप्रमुख संघटना तथा अपंग महासंघ म.रा. चे माधव लोलमवाड , म.रा.शिक्षक संघ (आटोळे गट) सुशिल गिरी , यांच्या मार्गदर्शनाखी स्वच्छ प्रतिमेचे , विद्यार्थीप्रिय शिक्षक , महिला भगिनींना उमेदवारी देण्यात आली आहे. 

          सहकार अभ्यासक , शिक्षक बांधवाच्या प्रश्नासंदर्भात वारंवार लढा देणाऱ्या संघटनाचा सहभाग , अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या संघटना ,  एक सामान्याचा पॕनल , सर्वांचा मान सन्मान , पतसंस्थेच्या हितासाठी , उत्कर्षासाठी , पतसंस्थेचा व्यवहार काटकसरीने , कोणताही अनाठाई खर्च  , अनाठाई छपाई , हारे तुरे बंद , कोलांटउड्या न मारणारे , कार्यालयीन  कर्मचारी भरती करणार नाही ,  वार्षिक सभेपुर्वी महिला भगिनीची सन्मान सभा घेतली जाईल व महिलांचा सहकार  पतसंस्थेत सहभाग जास्तीचा राहील ,  वचन पाळणारे असे सर्व उमेदवार  श्री गुरुसेवा पॕनल  शिक्षक बंधु-भगिनींच्या सेवेसाठी तत्पर आहेत.  या भुमिकेमुळे सभासद बांधवाचा उदंड प्रतिसाद मिळत आहे , तसेच मागील 20 ते 25 वर्षापासून अनावश्यक खर्च करुन सभासदांच्या पैशावर डल्ला मारणारे यांना धडा शिकवण्यासाठी  आता परिवर्तन अटळ आहे सभासद बांधव आता बदल झालाच पाहिजे असा निश्चय केला आहे , यापुढे यांनी कसे कसे किती किती पैसे खाल्ले ही मालिका लवकरच पत्रकार परिषद घेऊन  प्रसिद्ध करण्यात येईल, असे पॅनलप्रमुख संतोष अंबुलगेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *