मुंबई ;गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना दूरध्वनीवरून दिले.
पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे, यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतली. #गोवर झालेल्या मुलांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांत आवश्यक औषधे ठेवावीत. संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घ्यावी.
लसीकरणाचा वेग वाढविण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
#गोवर बाधितांचे सर्वेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले.