लोहा येथे लहुजी साळवे जयंती आणि अण्णा भाऊ साठे सभागृह लोकार्पण सोहळा आमदार श्यामसुंदरजी शिंदे  व सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

लोहा येथे लहूजी साळवे जयंती आणि आमदार स्थानिक विकास निधीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभामंडप बांधकाम कामाचे लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक लोहा,कंधार मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट, लोकप्रिय आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सिनेअभिनेते अनीलजी मोरे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. *यावेळी सौ.आशाताई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.* यानंतर *आमदार शामसुंदरजी शिंदे साहेब व सौ.आशाताई यांच्या हस्ते सभामंडपाच्या पाटीचे अनावरण करण्यात आले.* यावेळी कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग दाढेल यांच्या वतीने व समाज बांधवांच्या वतीने *आमदार साहेबांचा व सौ.आशाताईचा सत्कार करण्यात आला.* यावेळी बोलताना *आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब म्हणाले की, मातंग समाजाच्या सर्वांगीण* *विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. या ठिकाणी सभामंडपाच्या उर्वरित खर्चासाठी आणखी निधी देण्याचे आश्वासित केले.* याप्रसंगी *आशाताईंनी लहुजी साळवे यांना अभिवादन करून आमदार साहेबांच्या विकास कामांचा लेखाजोखा स्पष्ट केला.

याप्रसंगी उपसभापती श्याम अण्णा पवार,वसंत पवार, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, गजानन चव्हाण, भाऊराव कंधारे, अरविंद राठोड, पंकज परिहार, सिद्धू पाटील वडजे, चक्रधर डोके,अनिकेत जोमेगावकर, सरपंच फयाज शेख, सदाशिव कंधारे, शेख शेरफुद्दीन, बबन दाडेल, पांडुरंग शेट्टे, सत्तार शेख, सचिन शेटे, नारायण नागरगोजे, संदीप साळवे, बालाजी जाधव, शिवाजी मुंडे, सह कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग दाढेल महिला आणि समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *